जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील तेजस संजय कोठारी यांचे ११ (अकरा) उपवास आणि सौ आरती संदेश कोठारी यांचे ९ (नऊ ) उपवासाची पाचकवणी रविवार दिनांक २४/७/२०२२ रोजी सकाळी ९:३० वाजता जामखेड जैन स्थानकामध्ये झाली अशी माहिती जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांनी दिली.
परमपूज्य चंदनबालाजी म.सा. आणि परमपूज्य पद्मावतीजी म.सा. आदी ठाणा ६ यांच्या प्रेरणेने तेजस कोठारी याने अकरा उपवास आणि सौ आरती कोठारी यांनी नऊ उपवास करण्याचे धाडस केले आहे या अगोदर सुद्धा तेजस ने दोन वेळेस आठ उपवास केले होते कोठारी परिवारामध्ये तेजस चे पिताश्री संजय कोठारी आई सौ. सरला कोठारी यांनी पण या अगोदर असेच उपवास केले होते तसेच सौ. आरती संदेश कोठारी यांनी तेजसच्या तेला उपवासाची माळ घेतली आणि लगेच उपवास चालू केले आहेत जामखेड मध्ये जैन स्थानकामध्ये चातुर्मास प्रोग्राम जोरात चालू आहेत तरी तालुक्यातील सर्व जैन बांधवांनी पचकावणी साठी हाजरी लावली
या कार्यक्रमासाठी प्रशांत बकोरिया, बदनापुर जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष कटारिया, सुरेश राठौड़, अमित राठौड, सुमतिलाल बलदोटा, राजकुमार अचलिया, संजय भंडारी ढानकी, चंदूलाल कोठारी,अतुल कोठारी, अनिल कोठारी, गौतम कटारिया, अमित कोठारी, आनंद कोठारी , नेवासा जैन संघाचे अध्यक्ष संतोष ओस्तवाल ढाणकी, यश भंडारी,संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, सेक्रेटरी दिलीप गुगळे एडवोकेट नवनीतलाल बोरा, सुभाष भंडारी, राजेंद्र कोठारी, सुनील कोठारी, विजय गुंदेचा, संजय गुंदेचा, संजय नहार ,संतोष लोढा, सुनील पितळे प्रवीण छाजेड, पारस कोठारी, निलेश कटारिया, विलास खिंवसरा, संजय कटारिया आनंद गुगळे मनोज भंडारी ,महेंद्र बोरा , संपतलाल बोरा, सुमित चानोदिया, गणेश भळगट, संजय गांधी, मनसुखलाल गांधी वसंतलाल गांधी उपस्थित होते.