अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबीरात खर्डा परिसरातील हजारो नागरिकांनी घेतला मोफत रुग्णसेवेचा लाभ

0
158

 

जामखेड न्युज——

खर्डा शहरासह परिसरातील अनेक गावातील हजारो रुग्णांनी घेतला मोफत रुग्ण सेवेचा लाभ. याबाबत माहिती अशी की, आमदार रोहित पवार यांच्या आयोजनाने राज्याचे विरोधी पक्ष नेते नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत,जामखेड एकात्मिक विकास संस्था डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र तसेच पुणे येथील नामांकित हॉस्पिटल व फिरता दवाखाना यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली

 

 

खर्डा जिल्हा परिषद गटातील आतापर्यंत चाळीस गावात हे आरोग्य शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये हजारो रुग्णांनी याचा लाभ घेतला असून यावेळी रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली यामध्ये बीपी, शुगर यांचीही तपासणी करण्यात आली त्याचबरोबर रुग्णांना आजारावरील मोफत औषधे व गोळ्या देण्यात आल्या याचा लाभ आतापर्यंत खर्डा व परिसरातील चाळीस गावात तपासणी घेण्यात आला दिनांक २३ जुलै रोजी घेण्यात आलेल्या खर्डा व परिसरातील मुंगेवाडी, तरडगाव, मोहरी, सोनेगाव, गवळवाडी, धामणगाव, पिंपळगाव आळवा व आपटी या गावातील शेकडो रुग्णांनी या तपासणीचा गरीब व गरजू अशा विविध आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना याचा मोठा फायदा या माध्यमातून झाला आहे.

 

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दत्तराज पवार, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे माजी ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब ढगे, शाम महाराज सकट, सुनील काळे, आमदार रोहित पवार कार्यालयाचे सचिन वानरे इत्यादी सह डॉक्टर व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here