दोन वर्षांनी होणाऱ्या नागपंचमी सणासाठी प्रशासन सज्ज!!

0
233
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज——
नागपंचमी यात्रे निमित्ताने नागरीकांनी मांडलेल्या सुचना नुसार योग्य ती खबरदारी घेऊन यात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल आसे अश्वासन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आज झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत दिले. 
नागपंचमी यात्रे निमित्ताने जामखेड शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जामखेड येथिल पंचायत समिती कार्यालयात आज दि २२ रोजी शांतता कमिटीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, महावितरणचे अधिकारी योगेश कासलीवाल, मार्केट कमिटीचे सचिव वाहेदभाई शेख, प्रा मधुकर राळेभात, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, मंगेश आजबे, भाजपा तालुका अध्यक्ष अजयदादा काशिद, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, नगरसेवक दिगंबर चव्हाण, शामीरभाई सय्यद, पवनराजे राळेभात, अमित जाधव, उमर कुरेशी, पांडुराजे भोसले, विकी सदाफुले, प्रा विकी घायतडक, राजेश मोरे, संपत राळेभात, अभिजीत राळेभात, सचिन देशमुख, गणेश मासाळ सह अनेक नागरिक उपस्थित होते. 
नागपंचमी यात्रेत शहरातील लाईटची व्यवस्था, सीसीटीव्ही ची व्यवस्था यात्रे मध्ये आसली पाहिजे, तसेच यात्रेत वाहने पार्किंग व येणार्‍या नागरीकांच्या दुचाकी चोरी जाणार नाहीत तसेच महीलांच्या सुरक्षेसाठी चांगला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. तसेच नागेश्वर पालखी ला अडथळा निर्माण होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. जामखेड शहरात ज्या ठिकाणी कुस्त्यांचा हगामा भरणार आहे त्या साठी पार्किंग ची व्यवस्था केली पाहिजे, शहरात पावसाळ्यामुळे खड्डे पडले आहेत ते नगरपरिषदेने बुजवले पाहिजेत, चार पाच दिवस लाईट जाणार नाही याची काळजी महावितरण कंपनीने घ्यावी अशी. माहिती उपस्थित आसलेल्या मान्यवरांनी केली. 
याला उत्तर देताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की महाराष्ट्रतुन या नागपंचमी यात्रेस लोक येतात. यात्रा सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थित व शांततेत पार पाडु. नागरीकांनी मांडलेल्या सुचना नुसार चुकीच्या पद्धतीने काम होत आसेल तर कारवाई होणार आहे. सर्व अधिकार्‍याना सोबत घेऊन ज्या ठिकाणी आनंदनगरी भरणार आहे त्या ठिकाणी पहाणी करुन जागा आखुन देण्यात येतील व उपाययोजना करण्यात येतील. शहरातील खड्डे देखील बुजविण्यात येतील पालखी मार्गाला आडचण येणार नाही यांची काळजी घेतली जाईल कुस्ती साठी पार्किंगची सोय मराठी शाळेबरोबरच अन्य ठिकाणी जागा पाहून करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here