जामखेड न्युज——
आज दि.२२ जुलै 2022 रोजी जामखेड येथील खर्डा चौकामध्ये ओ.बी.सी ना आरक्षण मिळाल्याबद्दल आदरणीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या लढ्याला यश मिळाल्याबद्दल पेढे वाटून फटाके वाजून व ढोलीबाजाच्या गजरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला,
यावेळी अॅड. डॉ. अरुण जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. व ते म्हणाले की ओ.बी.सी समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला. व त्यांचे नातू आदरणीय ॲड.बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी जनता दलाचे सरकार असताना. व्ही पी सिंगाचे सरकार ज्यावेळेस होते. त्यावेळेस त्यांनी सांगितले. की मला मंत्रीपदापेक्षा मंडल आयोग लागू करा. ही सगळ्यात महत्वाची मागणी केली होती.
इथल्या ओ.बी.सी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. या महाराष्ट्रातल्या तेली, माळी, साळी, कोळी, सुतार, न्हावी, धनगर, भटका व जेवढ्या ओ.बी.सी जाती आहेत. त्यांना मंडळ आयोग लागू करा. व्ही. पी. सिंगाचे सरकार खाली गेले. तरी त्यांनी माघार घेतली नाही. खरंतर कोर्टाने ओबीसी समाजाला आरक्षण लागू करण्याचा निकाल दिला आहे. तो निकाल सर्वात महत्वाचा आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर साहेबांना ओ.बी.सी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. या साठी त्यांना अटक झाली. त्यावेळेस मी स्वतः अटक होतो. त्यावेळेस आम्ही मुंबईला होतो. त्या अटकेचा फायदा आपल्या ओ.बी.सी समाजाला झालेला आहे. खरंतर इथले सर्व राजकीय पक्ष आहेत. हे सर्व राजकीय पक्ष ओबीसीच्या जीवावर आहेत. परंतु भूमिका मांडायची वेळ आल्यावर हे पक्ष बाजूला जातात. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये तमाम इथल्या ओ.बी.सीं नी, भटक्यांनी, दलितांनी, मुस्लिमांनी, एकत्र येऊन उद्याच्या काळामध्ये सत्ता ताब्यात घेतली पाहिजे.
आज जामखेड शहरांमध्ये जामखेडचे राजकारणात वेगवेगळ्या समाजातील हरिभाऊ बेलेकर, मुस्लिम समाजाचे नेते अजहर काजी, सुरेश जाधव, मा.सरपंच प्रा.कैलास माने सर असे समाजातील बुजुर्ग माणसं आहेत. एक काळ जामखेडचे राजकारण यांच्या हातात होते. जामखेडचा आमदार कोण करायचा. जामखेडचा सरपंच कोण करायचा. हे या ताकतीच्या माणसात होतं. हे सर्वजण या आनंद उत्सवात सामील झाले. तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले. त्याबद्दल सर्वांना पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करत आहोत. हा सर्वात आनंदाचा दिवस आहे. कालची जी निवडणूक होणार होती. त्यात ओ.बी.सी ला जागा नव्हती. उद्याची होणारी निवडणूक ओ.बी.सी आरक्षणामुळे या समाजाला न्याय मिळाला. असे ॲड .डॉ. अरुण जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
यानंतर हरिभाऊ बेलेकर यांनी मनोगत व्यक्त केले. व पुढे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला आरक्षण देऊन महान कार्य केले. त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. व ॲड. डॉ.अरुण जाधव यांच्यामुळे ह्या जल्लोषात सहभाग घेता आला. त्याबद्दल आभारी आहोत. असे मत त्यांनी मांडले. यानंतर विकी भाऊ सदाफुले म्हणाले. की ओ.बी.सी समाजाला आरक्षण मिळाले. या आरक्षणासाठी जो लढा महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी उभारला. व या लढ्याला यश आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओ.बी.सी आरक्षणासाठी मंत्रिपदाला लाथ मारली. व त्यांचेच वंशज आदरणीय ॲड.बाळासाहेब आंबेडकरांनी ओ.बी.सी ला आरक्षण मिळावे. म्हणून अतोनात प्रयत्न केले. त्याच पार्श्वभूमीवर जामखेड मध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड.डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली न भूतो न भविष्य असा एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा मध्ये त्यांनी पोतराजाची वेशभूषा केली होती व ओबीसी समाजाच्या न्यायासाठी व हक्कासाठी लढले होते. असे मत व्यक्त केले. यानंतर अजहर काजी, प्रा कैलास माने सर, लोक अधिकार आंदोलन नाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ, जमीर सय्यद यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित मा. सरपंच सुरेश जाधव, सुनील शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे जि. उपाध्यक्ष योगेश सदाफुले, ता. अध्यक्ष अतीश पारवे, रवी सोनवणे, अंकुश पवार, सावता बोराटे, विशाल पवार, सचिन भिंगारदिवे, भटके विमुक्ताचे नेते भीमराव सुरवसे, विशाल जाधव, लाला वाळके, रावसाहेब खोत, उबेद शेख, अमरनाथ डोंगरे, जितेंद्र जाधव, विष्णू म्हेत्रे, संतोष शेगर, वैजनाथ केसकर सर, राजू शिंदे, होलार समाजाचे नेते सुरज बिरलिंगे, दशरथ निमोनकर, भाऊसाहेब रासकर, महादेव गिरमे, संतोष चव्हाण, अक्षय समुद्र, बाबा सोनवणे, ओम आखाडे, दिनेश ओहोळ, नवनाथ आव्हाड, सुदाम शेगर आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष आजिनाथ शिंदे यांनी दिली,