जामखेड महाविद्यालयात जामखेड मध्ये आज रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील नरके यांनी अण्णा भाऊंच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.रंगनाथ सुपेकर यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना आण्णाभाऊच्या साहित्याचा आढावा घेतला यामध्ये कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ साठे “माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहिली” या लावणीच्या ओळी व वास्तवदर्शी अण्णाभाऊंची जीवन यांचा त्यांनी मागोवा घेतला.
