
आज सोमवार दिनांक 18 जुलै 2022 रोजी सकाळी जामखेड महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला या वर्गातील विद्यार्थिनी वैष्णवी अरुण मेहेत्रे व तिची आई रेखा अरुण मेहेत्रे महाविद्यालयात कामानिमित्त आले असताना त्यांच्याकडील पैशाचे पाकीट मैदानावर हरवले. त्यामध्ये 5000 रुपये होते व ते पाकीट महाविद्यालयातील कर्मचारी श्री सूर्यकांत माने यांना सापडले. त्यांनी अतिशय इमानदारीने व जबाबदारीने ते पैशाचे पाकीट माननीय प्राचार्य डॉक्टर सुनील नरके यांच्याकडे जमा केले.प्राचार्यांनी ते पाकीट रेखा मेहेत्रे यांना परत केले व श्री सूर्यकांत माने यांचे आभार मानून कौतुक केले.याप्रसंगी प्राध्यापक काळे डी वाय प्राध्यापक राऊत एस एन प्राध्यापक पठाण सर बिट्टू मोरे श्री नवगिरे सर व श्री राऊत सर उपस्थित होते.