जामखेड न्युज——
एकतर एक महिना उशीरा पेरणी पीके कोवळी यात दहा दिवसांपासून सतत पाऊस शेतात पाणी साचल्याने व
उन्हाचा तपास नसल्याने पीके सडून चालली आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
साकत परिसराला सोयाबीनचे आगार समजले जाते. गेल्या दहा दिवसांपासून परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचू लागले आहे. यामुळे जमिनीतून वर उगवत असलेली पीके सडून चालली आहेत.

या वर्षी तब्बल एक महिना पावसाअभावी उशिरा पेरणी झाली. गेल्या दहा दिवसांपासून सतत संततधार पाऊस सुरू आहे. पिके उगवत आहेत दहा दिवसांपासून कसलेही उन नाही यामुळे नुकतेच उगवत असलेली पीके पाणी साचल्याने सडून चालली आहेत.
जमीनीतून वर येण्याअगोदरच शेतात पाणी साचल्याने व उन नसल्याने पीके सडून चालली आहेत. एक तर महिना उशीर यात दहा दिवसांपासून सूर्यदर्शन नाही यामुळे अनेक ठिकाणी पीके पिवळी पडली आहेत तर पाणी साचलेल्या ठिकाणी सडून चालली आहेत. यामुळे परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत पाऊस कधी उघडतोय व उन कधी पडतेय याची वाट बळीराजा पाहत आहे.