जामखेड न्युज——
सेवा समितीच्या शिलेदारांचा स्नेह मेळावा यावर्षी जामखेड तालुक्यात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना घेऊन झाली. त्यानंतर सेवा समितीच्या ध्येय धोरणावर, तसेच संघटन बांधणी, पदाधिकारी यांचे व्यक्तीमत्व तसेच जबाबदाऱ्या यावर चर्चा करण्यात आली. समितीचे आतापर्यंत चे कार्य आणि विचारसरणी तसेच भविष्यात सेवा समिती च्या माध्यमातून होणारे ऐतिहासिक वास्तू आणि कार्यक्रम व प्रत्येक शिलेदार आर्थिक सक्षम करण्याविषयी चे मार्गदर्शन शिबिर याबद्दल सेवा समिती चे संस्थापक/अध्यक्ष शंकर अप्पा जाधव, उपाध्यक्ष राहुल आबा हरगुडे आणि कार्याध्यक्ष प्रविण झांबरे व सचिव आकाश शिंदे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रेम मोहिते ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नळी वडगाव मध्ये असणाऱ्या वृद्ध आश्रमास निवाऱ्यासाठी शेड बनवून देण्याचे आश्वासन लोखंडे महाराज यांना समितीच्या वतीने देण्यात आले. त्यानंतर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल सभापती डॉ. भगवान दादा मुरूमकर, बार्शी शहराचे नगरसेवक विनोद (नाना) वाणी, अप्पासाहेब हरगुडे, राहुल झांबरे सर, डॉ. संजय भोरे, नगरसेवक अजय दादा काळोखे यांचा सामाजिक राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच समितीतील पदाधिकारी यांनी वर्षभरात उत्कृष्ट कार्य केलेल्या २५ जणांचा सन्मान करण्यात आला.
त्यानंतरच्या सत्रात सेवा समिती चे पहिले नगरसेवक अजय दादा काळोखे, तसेच मंगेश दादा अजबे, आनंद काशीद सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समितीमार्फत भविष्यातील प्रमुख ध्येय, रनटेकडी येथे भव्य दिव्य मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचे स्मारक करणे यासाठी विशेष लक्ष घालण्याची विनंती राजकीय मान्यवरांना करण्यात आली. सभापती भगवान दादा मुरूमकर यांनी रन टेकडी लढाईचा इतिहास ज्वलंत ठेवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून पुढाकार घेतला पाहिजे तसेच राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी मिळून आपण ते काम लवकर पूर्ण करू, त्यासाठी लागेल ते सहकार्य करू आणि सोबत मिळून विकास करू असे आश्वासन समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. शेवटी भाई चंद्रशेखर नलावडे यांनी अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिवराय हे तलवारीच्या पलीकडे समजून घेऊन उत्कृष्ट प्रजाहित दक्ष राज्यकर्ते कसे होते हे अभ्यासून धोरणात्मक दृष्टिकोन अंगिकारला पाहिजे असे आवाहन केले.
शेवटी कार्यक्रमाचा समारोप स्नेह भोजना ने करण्यात आला, त्यानंतर सेवा समितीच्या शिलेदारानी जिद्दी ने काम करण्याचे अभिवचन देऊन एकमेकांचा निरोप घेतला..!!
कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सेवा समिती जामखेड कार्यकारणी दादासाहेब मोहिते, अशोक ढाळे, विशाल दौंड, बळीराम वराट, हर्षद ढाळे, कृष्णा डूचे,योगेश भराटे, दादासाहेब भराटे, महादेव केसकर, संदेश भोसले, अजय भोसले, बाळासाहेब भोसले तसेच समितीच्या सर्वच पदाधिकाऱ्यानी विशेष मेहनत घेतली. राज्यभरातून समितीचे अनेक शिलेदार कार्यक्रमासाठी उपस्थित होते…