थेट जनतेतून सरपंच निवडीचा शासनाने पुनर्विचार करावा – सरपंच निलेश पवार जनतेतून सरपंच निवड झाल्यास सदस्यांचे महत्व शुन्य

0
400
जामखेड न्युज——
शासनाने पुन्हा थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय घेतला पण ग्रामपंचायत सदस्यांच महत्त्व काय ? असा प्रश्न जामखेड तालुक्यातील बावीचे सरपंच निलेश पवार यांनी उपस्थित केला आहे.
मागच्या वेळी भाजपा सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला.आणि त्यावेळी झालेल्या बहुतांश
ग्रामपंचायतीमध्ये सरपंच एका गटाचे आणि सदस्य एक गटाचे निवडून आले. परिणामी दोन गटात सतत वादांमुळे अनेक गावाचा विकास खुंटला गेल्याचे दिसून आले.
जनतेतून निवडून आल्याचा दिमाख करत अनेक सरपंचांनी मनमानीपणे गावचा कारभार करत कोणत्याहि निर्णय प्रक्रियेत ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणं,सदस्यांना महत्व न देणं, हम करे सो कायदा म्हणत स्वतः सरपंच
ग्रामसेवकांच्या हाताशी धरून मनमानी कारभार करताना दिसत आहेत सदस्यांना कसलीही किंमत राहत नाही यातच सदस्य दुसऱ्या गटाचा असल्यास मग तर त्याच्या प्रभागात कसलाच निधी दिला जात नाही. 
 कारण एखाद्या ग्रामपंचायतीत सरपंच एका गटाचा
आणि सदस्य दुसऱ्या गटाचे निवडून आले. तर परिणामी त्या सदस्यांना दुजाभाव केला जातो आणि त्या सदस्यांच्या वार्डातील विकास कामे केले जात नाहीत. अशी जर सदस्यांची कोंडीत होत असेल तर सदस्य होण्यासाठी
निवडणूक तर कोण लढणार?
सदस्य म्हणून निवडून येवून उपयोग काय ? असा प्रश्न निर्माण होतो. यामुळे या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करून सदस्यांच्या अधिकारात वाढ करून वार्ड विकासासाठी निधीची तरतूद करून दिली पाहिजे, असे मत बावीचे सरपंच निलेश पवार यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले. 
मागच्या वेळी भाजपा सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला. आणि त्यावेळी झालेल्या बहुतांश
ग्रामपंचायतीमध्ये सरपंच एका गटाचे आणि सदस्य एक गटाचे निवडून आले. परिणामी दोन गटात सतत वादांमुळे अनेक गावाचा विकास खुंटला गेल्याचे दिसून आले. जनतेतून निवडून आल्याचा दिमाख करत अनेक सरपंचांनी मनमानीपणे गावचा कारभार करत कोणत्याहि निर्णय प्रक्रियेत ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणं, सदस्यांना महत्व न देणं, हम करे सो कायदा म्हणत स्वतः सरपंच ग्रामसेवकांच्या हाताशी धरून मनमानी करण्याची दाट शक्यता आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here