जामखेड न्युज——
सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ यांची कन्या समृद्धी हिचा आज वाढदिवस या निमित्ताने श्री साकेश्वर गोशाळेतील गोमातांना पुरणपोळी देण्यात आली.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड संचलित साकेश्वर गोशाळा साकत येथे आज दिं १८ रोजी सकाळी ठिक ९ वा गोशाळेतील गोमातांना कु समुद्धी सचिन गायवळ हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गायवळ परिवाच्या वतीने गोमातांना पुरणपोळ्या देउन वाढदिवस साजरा करण्यात आला .

गायवळ परिवार नेहमीच धार्मिक सांस्कृतिक कार्यात सहभागी असतो यावेळी श्री शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी सर्व हिंदुबाधंवाना आवहन केले प्रत्येकाने आपला वाढदिवस गोशाळेत साजरा करावा हिंदुधर्मात गाईचे खुप महत्त्व आहे आपला भारतीय स्वदेशी वंश टिकला पाहिजे जोपर्यंत गाई दुध देती तोपर्यंत साभळतात आणि म्हतारी झाली की कतलखान्यात विकतात हे पाप करु नका आपल्या गोमातेच महत्त्व समजून घ्या जनजागृती करा पशुधन टिकले पाहिजे यावर आपला देश चालतो हे विसरता कामा नये
कृषीप्रधान देश आपला आज आपणच स्वदेशी भारतीय वंश नाहिसा करु लागलो सर्व हिंदुना विनंती आपण पुढे होउन गोमाता वाचली पाहिजे आणि आज समुध्दी सचिन गायवळ या कुमारी ने जसे आपला वाढदिवसाचा खर्च टाळुन गोशाळेतील गाई वासरांना पुरणपोळ्या देउन वाढदिवस साजरा केला तसच आपणही करुया असे आहवाहन करण्यात आले यावेळी सचिन गायवळ मित्र परिवार उपस्थितीत होता.