जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
कोरोना काळात जी लोकहिताची कामे केली त्या कामामुळे मला समाजिक कामासाठी आणखी प्रेरणा मिळाली. कोणतेही काम करत असताना मी बोलण्यापेक्षा कामाला महत्त्व देत असल्याने माझा सर्वत्रच सन्मान होत आहे. असे प्रतिपादन जनसामान्यांच्या मदतीला नेहमीच धाऊन जाणारे सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ सर यांनी केले.
जामखेड तालुक्यातील ऐतीहासीक खर्डा शहरात आमदार रोहीत पवार विचार मंचाच्या वतीने कोविड योध्दा व सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ सर यांचा सत्कार सत्कार समारंभ व स्वच्छता अभियान कार्यक्रम नुकताच पार पडला यावेळी आपल्या सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी सिताराम गडावरील उंडेगावकर बाबा मंदीराच्या प्रागणात घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मतदार संघ क्षेत्र प्रमुख मधुकर राळेभात, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, सिताराम गडाचे प्रमुख हभप महालींग महाराज नगरे, आसाराम गोपाळघरे, श्रीकांत लोखंडे, ग्रामपंचायत सदस्या सौ. शितल शिंदे, सौ. सुनीता जावळे, सौ निताताई पवार, दिपक जावळे, संतोष साबळे, दादा जमकावळे, तुळशीदास गोपाळघरे, सुनील साळुंके, गोटु पंजाबी, टिल्लु पंजाबी, बाबा मोरे, राजु सय्यद, अवी सुरवसे, कल्याण सुरवसे, महालींग कोरे, स्वप्नील लौंडे, भिमराव घोडेराव, विकास शिंदे, बापु ढगेंसह विचार मंचाचे अध्यक्ष दत्तराज पवार व सर्व सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वानी विचार मंचाच्या कार्याचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
जामखेड तालुक्यातील ऐतीहासीक खर्डा शहरात आमदार रोहीत पवार यांच्या मातोश्री सौ. सुनंदाताई पवार यांची गाव स्वच्छता अभियानाची संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन खर्डा येथील पत्रकार दत्तराज पवार यांच्या पुढाकाराने खर्डा येथे आमदार रोहीत पवार विचार मंच्याची स्थापना करण्यात आली आहे. विचार मंचाच्यावतीने कोव्हीड काळात चांगल काम करून जनसामान्याच्या मदतीला धाऊन जाणाऱ्या सोनेगाव येथील सचिन गायवळ सर यांचा कोव्हीड योद्धा म्हणुन सन्मान करण्यात आला.

यानंतर सर्वच मान्यवरांच्या उपस्थित विचार मंचाच्या कार्यकर्त्याच्या वतीने प्रत्यक्षात स्वच्छता अभियान राबवुन सिध्दसंत सिताराम बाबा उंडगावकर यांचा गड, शेजारील देवी मंदीर व परिसराची संपुर्ण स्वच्छता करण्यात आली तसेच शहर व परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प करुन स्वच्छता अभियानाची सुरवात करण्यात आली. तसेच आठवडयातुन दोन दिवस शहरात स्वच्छता करणार असल्याचे मंच्याच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.
चौकट
कोरोनाच्या काळात सचिन गायवळ व त्यांचे बंधू उद्योगपती निलेश भाऊ गायवळ यांनी जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा केला तसेच किराणा, भाजीपाला वाटप केले शासकीय कार्यलयाला सॅनिटायझर मशीन दिले. आरोळे कोविड सेंटरला तीन लाख रुपयांची मोफत औषधे दिले त्यामुळे अनेक गोरगरीब जनतेला त्याचा खुप मोठा फायदा झाला आहे.