जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – ( सुदाम वराट)
जामखेड येथिल ल. ना. होशिंग विद्यालयातील इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी उपेश धनलगडे या खेळाडूने पश्चिम विभागीय राष्ट्रीय (रायपुर छत्तीसगड) स्पर्धेत गोळा फेक या क्रीडा प्रकारांमध्ये द्वितीय क्रमांक पटकविल्याने त्यास सिल्वर मेडल मिळाले आहे. त्यामुळे ल. ना. होशिंग विद्यालयाचे तसेच अहमदनगर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

उपेशचे वडिल राघवेंद्र धनलगडे हे क्रीडा शिक्षक आहेत. त्यांनी लहानपणापासून गोळाफेक याचे शिक्षण दिले आहे त्यामुळे चार वेळा तो गोळा फेक मध्ये राष्ट्रीय पातळीवर चमकलेला आहे. उपेशने गोळाफेकमध्ये यश मिळवल्याने शाळेचे, शिक्षकांचे व तालुक्याचे नाव मोठे केले आहे.
त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव (बापू) देशमुख, सचिव मोरेश्वर देशमुख, उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामतणी, खजिनदार राजेशजी मोरे, सहसचिव दिलीपशेठ गुगळे, संचालक अशोकशेठ शिंगवी, सैफुल्ला खान, सुमतीलाल कोठारी, बबनराव कुलकर्णी, रामदासजी फुटाणे, शरद काका कुलकर्णी सह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य पोपट जरे, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश अडसूळ, माजी प्राचार्य अनंता खेत्रे यांच्या सह विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मित्रमंडळी व नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.