जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जामखेड महाविद्यालयातील विद्यार्थी अभिमान लांडगे, आबासाहेब डोके, कृष्णा वनवे या तिघांची एसआरपीएफ
मध्ये निवड झाली उद्या ते प्रशिक्षणासाठी जालना येथे जाणार आहेत. अत्यंत कठिण परिस्थितीत जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर यश मिळविले आहे त्यामुळे त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
ADVERTISEMENT

यावेळी जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील नरके, गव्हाण इइलेक्ट्रिकल्स चे, महादेव गव्हाणे,, गणेश डोके, अॅड प्रवीण सानप, अॅड संग्राम पोले, अॅड घनश्याम राळेभात, गणेश भोंडवे, बाबू मोरे, दत्तात्रय मुळे, सौरभ सातपुते, अस्तीक डोके, अमृत लोहार, सागर बिरंगळ, दिनेश क्षिररसागर, पांडुरंग किलमिशे, उमेश डोंगरे, हरीभाऊ माने यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अत्यंत कठिण आर्थिक परिस्थितीवर मात करत
जिद्द चिकाटी व मेहनतीच्या बळावर वरील तिघांनी यश मिळवले आहे. इतर विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. सुनील नरके यांनी सांगितले.