जामखेड न्युज – – – – –
जामखेड चे सुपुत्र सीआरपीएफ जवान गणेश कृष्णजी भोसले हे गडचिरोली येथे देश सेवा करत असताना शहीद झाले . त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे लहान बंधू मयुर भोसले व परिवाराकडून साकेश्वर गोशाळा येथे एक टेम्पो हिरवा चारा गाईंना वाटप करण्यात आला.
ADVERTISEMENT
यावेळी प्रमुख उपस्थिती मयुर कृष्णाजी भोसले, पन्हाळकर हॉस्पिटल चे संचालक डॉ सुशील पन्हाळकर, जैन कॉन्फरन्सचे संजय कोठारी,शिऊर चे माजी उपसरपंच विठ्ठल चव्हाण , शिवप्रतिष्ठान तालुकाप्रमुख पांडुरंग भोसले, शिवनेरीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप टापरे, जयसिंग उगले, , राहुल पवार, किशोर गायवळ , निलेश भोसले सर, संभाजी इंगळे सर, नाना खंडागळे, प्रफुल्ल सोळंकी,आदी उपस्थित होते.
सुरुवातीला शहीद जवानांना वंदन करुन आदरांजली वाहण्यात आली. व सर्वांच्या हस्ते गायींना चारा वाटप करण्यात आला.
यावेळी वीर जवान तुझे सलाम, शहीद गणेश भोसले अमर रहे , भारत माता कि जय या घोषणेने परिसर दुमदुमला.
शाहिद गणेश भोसले यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू सर्वांना मदत करणारा होता. त्यांना लहानपणापासून सैन्याचे आवड होती , शालेय जीवनात एनसीसी च्या माध्यमातून कार्य केले व सीआरपीएफ मध्ये भरती होऊन १७ वर्ष देशसेवा करून ते देशासाठी गडचिरोली येथे शहीद झाले. आमच्या मोठ्या भावाचा आम्हाला अभिमान असून त्यांचे नाव उंचावण्यासाठी आम्ही सतत देशसेवा , सामाजिक सेवा करत आहे असे प्रतिपादन मयूर भोसले यांनी केले.