मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/ पाणंद रस्ते योजनेतंर्गत कामांना गती; कोट्यवधींच्या कामांसाठी वर्क ऑर्डर देण्यास सुरुवात

0
194
जामखेड न्युज – – – 
 शेत पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरिता आवश्यक असणाऱ्या साधनांची निवड करण्याकरिता उपयोगात येतात यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी तसेच इतर कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. या यंत्रसामुग्रीची वाहतूक करण्यासाठी बारमाही शेत/पाणंद रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे.  त्यासाठीच सरकार रोहयो अंतर्गत मातोश्री ग्राममृद्धी शेत पाणंद रस्ते योजना राबवते.
                             ADVERTISEMENT
 
या योजनेतंर्गत कर्जत जामखेड तालुक्यात आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून व राज्य सरकारच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शेत पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच आता नवीन खडीकरण रस्त्यांच्या कामासाठीच्या वर्क ऑर्डर देण्याचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे.  त्यानुसार जामखेड तालुक्यातील 58 कामांसाठी एकूण 16.5 कोटी रुपये तर कर्जत तालुक्यातील 91 कामांसाठी 21 कोटींच्या आसपास निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. त्याच्या वर्क ऑर्डर देण्याचे काम दोन्ही तालुक्यात सुरू करण्यात आले आहे.
जामखेड तालुक्यात यंदाच्या वर्षीची मंजूर मातीकामांच्या पाणंद रस्त्यांची 376 कामांपैकी 200 पेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत. व कर्जत तालुक्यातील 372 कामांपैकी 110 हून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. त्याचबरोबर उर्वरित कामेही प्रगतीपथावर आहेत. शेत/पाणंद रस्ते योग्य असल्यामुळे शेतकऱ्यांना ये जा करणे सोपे होते शिवाय एखादी वस्ती पाणंद रस्त्यावर असेल तर त्या ठिकाणी वैद्यकीय मदत पोचवण्यासाठी व रुग्णवाहिका जाण्यासाठी व इतरही काही घटना घडल्यास त्या रस्त्यांमुळे मदत पोचवणे सोपे होते. याबरोबरच शेत रस्ता चांगला असेल तर व्यापारी शेतातून माल खरेदी करत असताना देखील त्याला चांगला भाव देतात ज्याचा थेट आर्थिक फायदा हा शेतकऱ्यांना होताना पाहायला मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here