जामखेड न्युज – – –
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ठाकरे सरकार आणि पर्यायाणे शिवसेनेला (Shivsena) धक्क्यांवर धक्के देत आहेत. आता गुवाहाटी याठिकाणी गेलेला एकनाथ शिंदे यांचा गट अधिक सक्रिय झाला असून या आमदारांपैकी (MLA) अनेकांनी माध्यमांशी बोलताना जय महाराष्ट्र असं म्हटलंय. तर एकनाथ शिंदे विशेष विमानानं मुंबईत येणार असल्याची माहिती आहे. राज्यपालांची शिंदे भेट घेणार आहेत. यामुळे शिंदे गटाचे ठाकरे सरकारला धक्क्यांवर धक्के बसत असल्याचं दिसतंय. यातच आता मोठी माहिती समोर आली असून एकनाथ शिंदे दुपारनंतर मुंबईत येणार असल्याची माहिती आहे. यावेळी शिंदे राज्यपाल महोदयांना भेटणार असल्याची माहिती आहे. यावेळी माझ्यासोबत मोठा गट असल्याची माहिती ते राज्यपालांना देणार आहेत. शिंदे नेमकं काय म्हणालेत, याचे तीन अर्थ जाणून घ्या…
माझ्याकडे 40 आमदार :
आतापर्यंत संख्याबळाचं समीकरण जुळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं होतं. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असणं गरजेचं होतं. 37 हा आकडा एकनाथ शिंदे यांना गाठायचा होता. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे 40 आमदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा हादरा बसलाय. सत्तास्थापनेचा भाजपसोबत दावा एकनाथ शिंदे करतील, अशी शक्यता आहे. त्यासाठी ते मुंबईमध्ये दुपारी येतील. राज्यपालांची भेट घेतली, असंही सांगितलं जातं आहे. एका विशेष विमानाने एकनाथ शिंदे हे मुंबईला येणार असल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT

खरी शिवसेना हीच :
दरम्यान खरी शिवसेना ही आपल्यासोबत आहे, असंही ते म्हणालेत. यामुळे शिवसेनेसोबतच्या सर्व वाटाघाटी फोल ठरल्याचंही आता स्पष्ट झालंय. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फोनवरील संवादातून तोडगा निघालेला नसून आता परिस्थिती शिवसेनेच्या हाताबाहेर जात असल्याचंही सांगितलं जातंय. किती आमदार एकनाथ शिंदेकडे आहे, यावरुन शंका उपस्थित केली जात होता. संजय राऊत यांनी देखील मंगळवारी बोलताना अप्रत्यक्षपणे संख्याबळ मोजण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे आता शिवसेनेतच उभी फूट पडल्याचंही एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानं अधोरेखित झालंय.