महाराष्ट्रात आज दुपारचा शपथविधी?

0
242
जामखेड न्युज – – – 
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर राज्याचे राजकारण तापले आहे. सतत नवनवीन घडामोडी घडताना दिसतायंत. काल रात्री एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा खुलासा करत महाविकास आघाडीला जोर का झटका दिला. एकनाथ शिंदे आज मुंबईमध्ये (Mumbai) येण्याची शक्यता आहे, इतकेच नाही तर आज दुपारीच शपथविधी होण्याची शक्यता देखील राजकिय वर्तुळामध्ये वर्तवली जातेयं. यामुळे संपूर्ण देशाचेच लक्ष एकनाथ शिंदेंकडे आहे. शिंदे हे भाजपासोबतच सत्तास्थापन करणार हे स्पष्ट आहे. भाजपचे (BJP) मुंबईतील अनेक नेते सध्या एकनाथ शिंदेसोबतच असल्याचे काल दिसून आले. बच्चू कडू देखील एकनाथ शिंदेंच्या खैम्यात आहेत.
                          ADVERTISEMENT
एकनाथ शिंदेंचा मोठा दावा
राज्यातील 35 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन बंडखोरी करणारे मंत्री एकनाथ शिंदेंनी जर आज मंत्रीपदाचा राजीनामा दिला तर महाराष्ट्रात खरोखरच मोठा राजकीय भूकंप होणार. ज्याक्षणी एकनाथ शिंदे मंत्री पदाचा राजीनामा देखील त्याचवेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात येईल. काल रात्री उशीर शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांसोबत महत्वाची बैठक घेतलीये. आज दिल्लीमध्ये राज्यातील कांग्रेस आमदरांची बैठक देखील होणार आहे. दोन तृतीआंश आमदार जवळपास एकनाथ शिंदेंकडे आहेत, यामुळे सत्तास्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ असल्याचे दिसते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here