जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जामखेड येथिल फिनिक्स कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवत दैदीप्यमान यश संपादन केले आहे त्यामुळे रत्नापूर ग्रामस्थांच्या वतीने फिनिक्स कोचिंग क्लासेस व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रत्नापूर येथे आयोजित करण्यात आला होता. फिनिक्स कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला असे दत्तात्रय वारे यांनी सांगितले.

क्लासेसच्या वारे वैशाली दिलीप हिने 95.40 % गुण मिळवून कन्या विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर गणित विषयात 100 पैक्की 100 गुण मिळवले आहेत. त्यामुळे क्लासेसने आपला दर्जा सिद्ध केला आहे.
क्लासेसच्या इतरही विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे ढवळे पुजा 92.00% गण मिळवले आहेत तर गणितात 95 गुण आहेत. वारे प्रशांत 90% गणित विषयात 99, मोटे मयुरी 88% गुण मिळवून सायन्स विषयात 98 गुण, सुर्यवंशी गौरव इंग्रजी 95 व गणित विषयात 95 गुण मिळवले आहेत तर सुजल कदम यांने गणितात 90 गुण मिळवले आहेत.
क्लासेस मुळे गावातील शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत. यामुळे रत्नापुर ग्रामस्थांच्या वतीने फिनिक्स कोचिंग क्लासेस व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सरपंच दादासाहेब वारे यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. लक्ष्मण ढेपे सर होते यावेळी ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य तसेच शिक्षक व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
तेजस वाघ, विठ्ठल ढवळे, अनिकेत ढवळे, रोहन भोसले याही विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे म्हणाले की, रत्नापूर गावाला राजकीय, सामाजिक व शैक्षणिक वारसा लाभला तसेच ते शिक्षकांचे गाव म्हणूनही प्रसिद्ध आहे. गावातील गुणवंत विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनिअर, वकील या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे आता गणेश वारे पाटील यांच्या रूपाने फिनिक्स कोचिंग क्लासेसच्या रूपाने आपला शैक्षणिक क्षेत्रात एक दर्जेदार शिक्षण देणारा क्लास म्हणून ठसा उमटविला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोकुळ गायकवाड यांनी केले तर आभार सोले सर यांनी मानले
यावेळी कार्यक्रमास शिक्षक बँकेच मुकुंद ढवळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश ढमढेरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाक पठाण, तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य उद्धव ढवळे, हरी वराट, अनंत वारे, दिलीप आश्रू वारे, दिलीप वारे, माजी सरपंच बंडू वारे, शैलेश कदम, पांडुरंग ढवळे, चेअरमन बबन ढवळे, कृष्णा वारे, दादा वराट, मुख्याध्यापिका उर्मिला उगले, गोकुळ गायकवाड, गौतम सोले, शमिन शेख, वैशाली घुमरे, स्मिता निंबाळकर, बाळासाहेब औटे, शिवदास वारे यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.




