जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
21 जून जागतिक योग दिनानिमित्त सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर व रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयाच्या विद्यमानाने विद्यालयात सकाळी योग दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, एनसीसी कॅडेट , पालक, शिक्षक यांनी उत्साहा मध्ये योग दिन साजरा केला.
यावेळी प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका सौ चौधरी के डी , आरोग्य विभागाचे डॉक्टर राहुल राख, शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे,पर्यवेक्षक प्रकाश सोनवणे, रघुनाथ मोहोळकर गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, प्रा रमेश बोलभट , एनसीसी प्रमुख मयूर भोसले नागेश विद्यालयातील सर्व स्टाफ ,कन्या विद्यालयातील सर्व स्टाफ , एनसीसी कॅडेट,विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संतोष सरसमकर यांनी प्राणायाम, शारीरिक व्यायाम, योग प्रात्यक्षिके , श्वसनाचे प्रकार ,सूर्यनमस्कार यावर मार्गदर्शन केले.
कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक कसरतीचे महत्त्व पटवून दिले व सर्वांनी दररोज व्यायाम करावा असे मार्गदर्शन केले. डॉ राहुल राख यांनी योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी व्यायामाचे फायदे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या ए टी सी कॅम्प मध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून प्रमाणपत्र वाटण्यात आले. महाराष्ट्र राज्य आईसर मार्फत गणित विज्ञान विषय प्रशिक्षणास श्री संतोष ससाणे यांची निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
प्राचार्य मडके बी के यांनी विद्यार्थ्यांनी व्यायामाबरोबर आहाराची माहिती दिली व विद्यार्थ्याने दररोज सकाळी व्यायाम करावा असे मार्गदर्शन केले.
सुत्रसंचलन रमेश बोलभट तर आभार प्रदर्शन संतोष ससाने यांनी केले.




