जामखेड न्युज – – –
धनेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी तुराब अल्लाउद्दीन शेख यांची तर व्हाईस चेअरमन पदी बबन चंद्रभान वाळुंजकर यांची निवड —
जामखेड तालुक्यातील धनेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत विठ्ठल-रुक्मिणी शेतकरी विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सरपंच महिंद्र काळे, ईश्वर चव्हाण व उत्तम रसाळ यांच्या नेतृत्वाखाली तेरा संचालक दणदणीत मतांनी विजयी झाले होते.
दिनांक 20 जून रोजी सर्वानुमते झालेल्या बैठकीत तुराब अल्लाउद्दीन शेख यांची चेअरमनपदी निवड झाली असून व्हाईस चेअरमन पदी बबन चंद्रभान वाळुंजकर यांची निवड घोषित करण्यात आली.
या निवडणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे सोनेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा.सचिन गायवळ यांनी या निवडणुकीत उभे राहून भरगोस मतांनी निवडून आले असून त्यांनी या निवडणुकीत दमदार कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून सहकाराच्या माध्यमातून येणाऱ्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रबळ दावेदार होण्याची शक्यता त्यांच्या माध्यमातून निर्माण झाली आहे.
यावेळी सोसायटीचे संचालक महिंद्र काळे सौ गिरजाबाई वाघ, सौ आशा टिपरे, बिबीशन निर्मळ, साहेबराव लोहकरे, अण्णा उंबरे,सतीश काळे दिगंबर बोंद्रे,तरडगावचे चेअरमन जयराम खोत इत्यादी उपस्थित होते.
नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळाचे सभापती सूर्यकांत मोरे,साकतचे मा.सरपंच हनुमंत पाटील,नगरसेवक अमित जाधव इ.च्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
या प्रसंगी सोनेगाव चे माजी सरपंच पद्माकर बिरंगळ, महेश काळे, चांद भाई शेख, नाशिर पठाण, बशीर शेख, विलास भोळे इत्यादी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निलेशकुमार मुंडे यांनी काम पाहिले.




