जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत कर्जत जामखेड मतदार संघात झालेला विजय हा खरा सर्जिकल स्ट्राईक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा दिड वर्षानी निघाला आहे. दिड वर्षात मतदार संघात दिड रूपयांचे काम नाही. व निवडणूकी आगोदर मतदारसंघात वेगवेगळे मेळावे घेतले जनतेला भुलभुलैय्या दाखविला आता जनतेने आमदाराला मेळाव्याबाबत जाब विचारला पाहिजे असे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.
नगरपरिषद निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर
भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनिलजी कर्जतकर, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, कर्जत जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रभारी अभय आगरकर, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर,
रवी सुरवसे, युवक अध्यक्ष शरद कार्ले, रविंद्र अनासपुरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता जगदाळे, नगर जिल्हा बॅंकेचे संचालक अमोल राळेभात, सुधीर राळेभात, अर्चना राळेभात, मनोज कुलकर्णी, लहू शिंदे, अभयराजे राळेभात, प्रविण सानप, पांडुरंग उबाळे, विठ्ठल राऊत, अनंता खेत्रे, सलिम बागवान, प्रविण चोरडीया, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, संतोष गव्हाळे, अमजद पठाण, तात्याराम पोकळे, बाळासाहेब देशमाने, अरणगावचे सरपंच अंकुश शिंदे, श्रीराम डोके, तुषार बोथरा, गोरख घनवट, अर्जुन म्हेत्रे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांना त्रास देत आहे. विजेची कनेक्शन तोडली जात आहेत भाजपाने पाच वर्षांत एकाही शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले नव्हते.
तसेच मतदारसंघात सध्या हुकुमशाही सुरू आहे. भाजपा कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी नोटीसा न देता टपऱ्या काढल्या जात आहेत. मात्र भगवान शंकराची मुर्ती बसवताना कोणतीही परवानगी घेतली नाही.
मी मंत्री आसताना अनेक नगरसेवक माझ्याकडे आले मी त्यांना सन्मानाची वागणूक दिली विमानाने फिरवले पण विद्यमान आमदार त्यांना त्यांच्या गाडीतही बसवत नाहीत.
निवडणूक पुर्व चाचणीत नगरपरिषद भाजपाच्या ताब्यात येणार असा सर्व्हेचा अंदाज आहे. दिड वर्षात आमदाकडे गेलेले नगरसेवक परत आमच्याकडे येत आहेत त्यांचे स्वागत आहे. आणखीही बरेच जण येण्यासाठी इच्छुक आहेत. यावेळी तिकीट देताना सर्व्हेत निवडूण येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच तिकीट मिळेल
यावेळी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे म्हणाले की, कर्जत जामखेडचे आमदार जनतेची दिशाभूल करीत आहेत काम शुन्य आहे. पवार घराण्यांनी आतापर्यंत फसवाफसवीचे राजकारण केले आहे. आपल्या मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामांमुळे नगरपरिषद भाजपा कडेच राहिल याचे उदाहरण म्हणजे जिल्हा बॅंकेत कर्जत-जामखेडमध्ये भाजपाने विजय मिळविला आहे.
यावेळी बोलताना सुनिल कर्जतकर म्हणाले की,
नगर जिल्ह्यात भाजपासाठी खाते खोलणारा जामखेड हा पहिला तालुका आहे. पहिला जिल्हा परिषद सदस्य, पहिला आमदार याच तालुक्याने दिला. पवारांना चकमा देणारा कर्जत-जामखेड हाच मतदारसंघ असेल. कर्जत मध्ये पवारांच्या समोर जिल्हा बॅकेसाठी मतदारांची परेड झाली तरिही मतदान मिळाले नाही. भाजपाचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता येईल.
भाजपा हा छोट्या कार्यकर्त्यांना मोठे करते कामाला किंमत दिली जाते. शेतकरी आंदोलनाविषयी रोहित पवार यांना विचारावे ते काहीही सांगू शकणार नाहीत. पवार हे जाहगिरी म्हणून वागतात गोड बोलून सत्ता हस्तगत करतात व आपले उद्योगधंदे वाढवितात शरद पवार शेतकरी आंदोलनाविषयी बोलतात आणी मतदानादिवशी राज्यसभेत गैरहजर राहतात. जनतेची दिशाभूल करतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले की, नुकत्याच झालेल्या
ग्रामपंचायतमध्ये भाजपाला पन्नास टक्के यश मिळाले आहे. आमदारांचे काम शुन्य आहे राम शिंदे यांचीच कामे सुरू आहेत. गवगवा मात्र मोठा करतात. सध्या दहशत सुरू आहे. दिड वर्षात आमदारांनी काम दाखवावे.
जामखेड नगरपरिषदेत 21 प्रभाग 32 बुथ व 31500 मतदार आहेत अशी सविस्तर माहिती दिली.
यावेळी सुधीर राळेभात, अमजद पठाण, सलिम बागवान, हिरालाल गुंदेचा यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता जगदाळे यांनी मानले.