Thursday, September 10, 2026
Home ताज्या बातम्या मळणी यंत्रात अडकून महिलेचे निधन

मळणी यंत्रात अडकून महिलेचे निधन

0
489
मळणी यंत्रात अडकून महिलेचे निधन
करमाळा प्रतिनिधी 
    जामखेड न्युज – – – 
करमाळा तालुक्यातील पोथरे (ता.करमाळा) येथील सौ.उषा पंडीत झिंजाडे (वय-४२) या शेतकरी महिलेचे मळणी यंत्राच्या शाप्टमध्ये डोके अडकल्याने डोके व धड वेगवेगळे होवून जागीच निधन झाले आहे. हा प्रकार आज (ता.२६) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
सध्या सर्वत्र सुगीचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असून पोथरे येथेही सुगीचे काम गतीमान आहे. पोथरे येथील शेतकरी पंडीत झिंजाडे, मुलगा अनिकेत झिंजाडे व पत्नी उषा झिंजाडे हे तिघेजण मळणी यंत्रावर ज्वारी करीत होते. जवळपास ज्वारी मळणीचे काम संपत आले असताना मळणी यंत्राखाली पडलेले भुसकट काढण्यासाठी उषा झिंजाडे या वाकून भुसकट काढत होत्या. त्यावेळी ट्रॅक्टर व मळणी यंत्र ज्या ठिकाणी जोडले जाते त्या शाप्टमध्ये उषा झिंजाडे यांच्या डोक्याचे केस अडकले व शाप्टसोबत त्यांचे डोके फिरुन डोके शरीरापासून वेगळे झाले. काही समजण्याच्या आत ही दुर्घटना घडली आहे. उषा झिंजाडे यांच्या मागे पती, मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी करमाळा पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे. हि घटना समजताच पोथरे व परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
   सध्या सुगीची धामधूम सुरू आहे. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी गडबडीत वाईट घटना घडतात. तेव्हा मळणी यंत्र हाताळताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!