जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जामखेड शहरातील फिनिक्स कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी सलग पाचव्या वर्षीही विविध विद्यालयातून दैदीप्यमान यश केल्याने क्लासेसने पालकांचा विश्वास सार्थ ठरविला आहे. क्लासेसच्या वारे वैशाली दिलीप हिने 95.40 % गुण मिळवून कन्या विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर गणित विषयात 100 पैक्की 100 गुण मिळवले आहेत. त्यामुळे क्लासेसने आपला दर्जा सिद्ध केला आहे.
फिनिक्स कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे ढवळे पुजा 92.00% गण मिळवले आहेत तर गणितात 95 गुण आहेत. वारे प्रशांत 90% गणित विषयात 99, मोटे मयुरी 88% गुण मिळवून सायन्स विषयात 98 गुण, बिरंगळ आरती 89% गुण मिळवून गणितात 99 गुण आहेत. जायभाय पुनम 88% जगताप सानिका 87%, सुर्यवंशी गौरव इंग्रजी 95 व गणित विषयात 95 गुण मिळवले आहेत. समिंदर राज गणित 94 गुण, सुजल कदम यांने गणितात 90 गुण मिळवले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोपट जगदाळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना ते म्हणाले की, फिनिक्स कोचिंग क्लासेसच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थांकडे वैयक्तिक लक्ष दिले सराव करून घेतला यामुळेच प्रथम येण्याचा मान विद्यार्थ्यांनी पटकाविला आहे. व गणितात पैकीच्यापैकी पैकी गुण मिळवले आहेत.
यावेळी पालक दिलीप वारे, संजय ढवळे तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी फिनिक्स कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. गणेश वारे पाटील, प्रा. दशरथ कोळेकर, विनित पंडित यांच्या सह अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
चौकट
मागे 2020 मध्येही राऊत श्रद्धा हिने 98% गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला होता. तर निधी गांधी हिने 97.20 %गुण मिळवून ल. ना. होशिंग विद्यालयात प्रथम आली होती. तर जगदाळे प्रथमेश यांने गणितात 98 व सायन्स मध्ये 97 गुण मिळवले होते.