जामखेड तालुका माजी सैनिक  संघटनेच्या वतीने अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न अमृत जवान सन्मान अभियान 2022 समारोप सोहळा संपन्न

0
212
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – – 
महाराष्ट्र शासनाच्या वतीने जामखेड तहसील कार्यालय अंतर्गत अमृत जवान सन्मान अभियान 2022 चा समारोप जामखेड येथे तहसील कार्यालयात करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार भोसेकर, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पिसाळ साहेब गटविकास अधिकारी प्रकाश पोळ ,कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, महावितरणचे योगेश कासलीवाल , गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे,सर्कल नंदकुमार गव्हाणे , तलाठी विश्वजीत चौगुले, भूमी अभिलेखचे देशमुख साहेब, प्राचार्य सुनील नरके, प्राचार्य श्रीकांत होशिंग , प्राचार्य मडके बी के, माजी सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बजरंग डोके ,अध्यक्ष -दिनकर भोरे, उपाध्यक्ष- नानासाहेब बाबर, कार्याध्यक्ष रावसाहेब जाधव, सचिव अंकुश जगदाळे, खजिनदार शिवाजी साळुंके, होणमाने मेजर ,सहदेव शिंदे सुखदेव शिंदे, इथापे मेजर अरविंद जाधव, महादेव नेमाने, अंगत कोल्हे ,एनसीसी ऑफिसर गौतम केळकर, अनिल देडे, मयूर भोसले . आजी माजी सैनिक माता भगिनी व  विविध विभागातील कर्मचारी प्रतिनिधी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  यावेळी माजी सैनिक संघटना जामखेड च्यावतीने माजी सैनिकांचे हित जपणारे व सैनिकांसाठी तत्परतेने कार्य करणारे सर्व अधिकाऱ्यांचा व सन्मानित व्यक्तींचा सन्मान सोहळा संपन्न झाला.
       मनोगतामध्ये नायब तहसीलदार भोसेकर साहेब यांनी आमचा जो सन्मान केला त्याबद्दल सर्व माजी सैनिकांचे आभार मानले .आम्ही तुमच्या कार्यासाठी तत्पर आहोत व तुमचे कोणतेही काम असेल तरी आम्ही ते पूर्ण करू व येथून पुढेही अमृत महोत्सव चालू राहील असे मनोगत व्यक्त केले. व त्यांनी आर्मी मधील ट्रेनिंगचे आपले काही अनुभव सांगून सैनिकांसाठी आम्ही तत्पर आहोत असे मत मांडले.
    जामखेड चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी माजी सैनिकांचे काही अडचणी असतील त्यांनी समक्ष येऊन भेटून आम्ही तत्परतेने ते सोडवू व सैनिकांसाठी प्राधान्याने कार्य करू असे मत व्यक्त केले.
       व माजी सैनिकांनी तरुणांना योग्य मार्गदर्शन करावे व चांगले कार्य करण्यास प्रवृत्त करावे. व माजी सैनिकांना काही अडचण असल्यास आम्ही ते तत्परतेने सोडवू असे मनोगत व्यक्त केले.
    तसेच उपस्थित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजी- माजी सैनिकांसाठी कार्य करनार असे मनोगतात सांगितले.
       कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  अनिल देडे तर आभार प्रदर्शन मयुर भोसले यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here