अजब प्रथा – पत्नी गरोदर राहताच भारतातील या गावात पुरूष करतात दुसरे लग्न

0
205
जामखेड न्युज – – – – 
भारतात वेगवेगळ्या भागात अनेक प्रथा आहेत.कधी कधी काही प्रथा या अविश्वसनीय वाटतात. सध्या राजस्थानच्या एका गावची प्रथा चांगलीच व्हायरल होतेय. या प्रथेनुसार बायको गरोदर झाली की नवरा दुसरं लग्न करतो.हो, हे खरंय.भारतात पहिल्या बायकोला घटस्फोट न देता दुसऱ्या लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे.अशात बायको गरोदर असताना नवरा खुशाल दुसरं लग्न करतोय. विशेष म्हणजे या लग्नाला गरोदर बायकोही समर्थन देते. सध्या सर्वत्र या प्रकरणाची चर्चा होतेय.
ही अजब प्रथा राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील देरासर गावातील आहे.कित्येक वर्षापासून ही प्रथा पाळली जाते. विशेष म्हणजे या प्रथेमागील कारण ऐकाल तर थक्क व्हाल. बायको प्रेग्नंट असताना नवरा दुसरे लग्न पाण्यासाठी करतो. हो, या गावात पाण्याची समस्या आहे आणि गावातील महिला कित्येक मैल पायपीट करून पाणी आणतात.मग त्यासाठी स्वत: महिला गरोदर असताना नवऱ्याचे दुसरे लग्न लावून देतात.
बायको गरोदर झाल्यावर घरकामाचा विशेष म्हणजे कित्येक मैल पायपीट करुन पाणी आणण्याचा प्रश्न निर्माण होतो.आणि या गावातील पुरुष घरकाम करत नाहीत.त्यामुळे दुसरं लग्न पर्याय उत्तम असतो.यामुळे गरोदर पत्नीला आराम मिळते त्यामुळे तिला या लग्नाचा काहीच त्रास होत नाही. सध्या या गावाची प्रथा चर्चेचा विषय ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here