सदिच्छा मंडळाला जामखेडमध्ये सुरुंग. विकास मंडळाचे विश्वस्त हनुमंत गायकवाड यांचा गुरूमाऊली मंडळात प्रवेश

0
223
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – – 
   नुकताच मागील आठवडय़ात सदिच्छा मंडळातील काही सभासदांनी गुरूमाऊली मंडळात प्रवेश केला होता यामुळे सदिच्छा मंडळाला खिंडार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या यावर सदिच्छा मंडळाने सांगितले होते की, आम्हाला कसलेही खिंडार नाही पण सदिच्छा मंडळाचे ज्येष्ठ नेते व विकास मंडळ विश्वस्त हनुमंत गायकवाड यांनी सदिच्छा मंडळाला रामराम ठोकला व गुरुमाऊली मंडळात प्रवेश केला यामुळे सदिच्छा मंडळाला सुरुंग लागला आहे.
       जामखेड सदिच्छा मंडळाचे जेष्ठ नेते मा.विकास मंडळ विश्वस्त हनुमंत गायकवाड यांच्या गुरूमाऊली मंडळात बापूसाहेब तांबे यांच्या उपस्थित प्रवेश झाला यावेळी विद्याताई आढाव,अंजली मुळे,,विठ्ठल फुंदे, सदगीर,केरू डोखे, जामखेड तालुक्यातून उपस्थित विकास मंडळ विश्वस्त गोकुळ गायकवाड,राज्य नेते किसन वराट,संतोषकुमार राऊत,पदवीधर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष मुकुंद सातपुते,जिल्हा उपाध्यक्ष विनोद सोनवणे,जिल्हा कार्यकारणी शहाजी जगताप,श्रीहरी साबळे,माजिद शेख,बाबा कुमटकर,रामदास गंभिरे,विकास बगाडे,सुनिल कुमटकर,केशव हराळे,उच्चाधिकारचे तालुका अध्यक्ष जालिंदर भोगल,तालुका कार्यकारणीतील निशाताई कदम,प्रविण ढगे,भगवान समुद्र,बापू कोळी राजाभाऊ राठोड,शिरिष कदम,रामहरी बांगर,राजीव मडके,पांडुरंग मोहळकर,एकनाथ(दादा)चव्हाण
 बापूसाहेबांचा  बँकेच्या कारभार यावर खूष होऊन सर्व सामान्य सभासदांच्या हितासाठी  गुरूमाऊली मंडळात प्रवेश करत आहे.बापूसाहेब तांबे, राजाभाऊ साळवे, दत्तात्रय कुलट व सर्वच संचालकांनी गेल्या पंचविस वर्षात झालाच नाही असा कारभार केला आहे.त्यांनी त्यांचे दिशादर्शक काम केले.आज सर्व सभासदांना विनंती आहे.आपल्याला बापूसाहेब यांच्या गुरूमाऊली मंडळाच्या मागे खंबीरपणे उभे राहून बँकेतील सत्ता बापूसाहेबांच्या हाती दयावी लागेल.तसे झाले नाही तर लचके तोडणारे तर आहेतच आणि पुन्हा फिरून तेच दिवस 11 ते 15% व्याजदर,1% डिव्हीडंड अशा अनेक गोष्टी…मी हया मंडळाचा,मी त्या मंडळाचा असा विचार न करता मी बँकेचा सभासद आहे.बँक माझी कामधेनु आहे.त्यासाठी फक्त बापूसाहेबांना साथ दया.मी त्यामुळे गुरूमाऊली मंडळात प्रवेश घेतला. अशी भावना हनुमंत गायकवाड यांनी व्यक्त केली.
सारवासारवीची केवीलवाणी धडपड सदिच्छा कडून चालू आहे.श्रीगोंदाच्या तालुका अध्यक्ष्यानीच यांना सोडले.यांची भाषा त्यांच्या हाकलपट्टीची,जेष्ठ नेते केशव गायकवाड(तात्या),बाबा कुमटकर ते काल प्रवेश झालेले महेश धामणेसह अनेक प्रवेश सदिच्छा मंडळाला सुरूंग लागल्याचे आणि बापूसाहेबांचा विजय दर्शवत आहे.दुसऱ्यावर टिका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा.
ना सत्तेसाठी…..
ना स्वार्थासाठी…..
 ना नातेवाईकांसाठी
 आपली लढाई फक्त…. सभासद हितासाठी
एकनाथ(दादा)चव्हाण
जामखेड तालुका अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ
जय संघ,जय गुरूमाऊली यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here