जामखेड न्युज – – – –
जामखेड तालुक्यातील साकत येथिल श्री साकेश्वर विद्यालयातील इयत्ता दहावीचा निकाल 97.82 लागला आहे यात. श्रेया कैलास वराट हिने 89.80% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला तर अदित्य रामहरी वराटने 86.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला तर पल्लवी रविंद्र मुरुमकर हिने 86.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला याबद्दल विद्यार्थी व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे आहे विद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उध्दवराव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेशजी मोरे सह सर्व संचालक मंडळ तसेच पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर, संजय वराट, सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, ज्ञानदेव मुरुमकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम मुरुमकर, माजी सरपंच हरीभाऊ मुरुमकर, कांतीलाल वराट, सदाशिव वराट, चेअरमन कैलास वराट, माजी चेअरमन प्रा. अरुण वराट, गणेश वराट, पोलीस पाटील महादेव वराट, बाळासाहेब वराट, डॉ. अजय वराट यांच्या सह अनेकांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
श्री साकेश्वर विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात 46 विद्यार्थी होते यातील 45 विद्यार्थी पास झाले तर एक विद्यार्थी एटीकेटीत बसला आहे. यात श्रेया कैलास वराट हिने 89.80% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला तर अदित्य रामहरी वराटने 86.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला तर पल्लवी रविंद्र मुरुमकर हिने 86.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला 80% पेक्षा जास्त गुण मिळवणारे 13 विद्यार्थी आहेत. विद्यालयाच्या यशाबद्दल संस्था, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.









