जामखेड न्युज – – – –
जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील मयुर (अर्थव) महादेव ( मिनेश) या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने राहत्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे कर्जत व जामखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महादेव ( मिनेश) हजारे हे तालुक्यातील देवदैठण येथील रहिवासी असुन ते कर्जत तालुक्यात शिक्षक म्हणून नोकरीला आहेत. त्यांचा मुलगा मयुर (अर्थव) हा कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता काल दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला यात मयुर यास ६० % गुण मिळाले यामुळे त्यास नैराश्य आले व घरात कोणी नसताना राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली यामुळे परिसरातील एकच खळबळ उडाली आहे. आज देवदैठण येथे सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयुर हा जामखेड येथिल साईबनचे तसेच साई फोटो लॅबचे मालक संजय हजारे यांचा पुतण्या होता.
चौकट
दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला आहे यात अनेकांना मनाप्रमाणे गुण मिळाले नसतील तरीही कोणीही खचून जाता कामा नये. दहावीवर तर सध्या काहीच नाही कमी गुण मिळाले तरीही नाउमेद न होता परत चांगला अभ्यास करा जीवनात नक्कीच यश मिळणार आहे. कमी गुण मिळाले म्हणून कोणीही आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलू नये आपल्या आई वडिलांना दु:खात टाकू नये.
डॉ. संजय भोरे – अध्यक्ष सनराईज शैक्षणिक संस्था जामखेड









