जामखेड न्युज – – – –
तालुक्यातील कोल्हेवाडी येथील जय हनुमान माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडीचा इयत्ता दहावीचा निकाल १००% लागला असुन यात निखिल आप्पा कोल्हे यांने ८९.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला, धनश्री मनसूब कोल्हे याने ८९.४०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला तर वैष्णवी बळीराम कोल्हे याने ८८.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला यामुळे अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी येथील दहावीचा निकाल निकाल शंभर टक्के लागला असून निखिल आप्पा कोल्हे यांने ८९.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला, धनश्री मनसूब कोल्हे याने ८९.४०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला तर वैष्णवी बळीराम कोल्हे याने ८८.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट यांनी शाळेत जाऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला यावेळी राजाभाऊ कोल्हे, बळीराम कोल्हे, मनसुब कोल्हे, मुख्याध्यापक राधे मुरुमकर, सुनिल भालेराव, सानप मॅडम, अप्पा कोल्हे, सागर कोल्हे, रामभाऊ कोल्हे, महादेव कोल्हे, अजय कोल्हे, संग्राम कोल्हे व इतर गावातील गावकरी मंडळी विध्यार्थी उपस्तित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट व मुख्याध्यापक राधे मुरुमकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाळेच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट, सचिव प्रा. कैलास वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट, प्राचार्य युवराज मुरुमकर, बळीराम कोल्हे, राजाभाऊ कोल्हे, वाल्मिक कोल्हे, कोल्हेवाडी सेवा संस्थेचे चेअरमन लक्ष्मण कोल्हे, व्हा. चेअरमन रामहारी नेमाने, साकतचे उपसरपंच राजाभाऊ वराट, ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट, नानासाहेब लहाने यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
चौकट
निखिल कोल्हे हा दिव्यांग असुनही त्याने अपंगत्वावर मात करत जिद्दीने 89.60% प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यांच्या जिद्दीला सलाम









