जामखेड न्युज – – –
10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर प्रसिद्ध केला जाईल. बोर्डाने याबाबत कोणतीही घोषणा केली नसली तरी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या विधानाच्या आधारे ही शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षेचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर होईल, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले होते. पण सर्व मीडिया रिपोर्ट्स नुसार, निकाल हा २० जूनच्या आधी जाहीर होणं अपेक्षित आहे. त्याचवेळी,
काही प्रसारमाध्यमांमध्ये असे देखील बोलले जात आहे की आज निकाल जाहीर केला जाऊ शकतो, परंतु सध्या तरी शिक्षणमंत्र्यांनी कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.
महाराष्ट्रात एसएससीच्या परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत झाल्या. अनेक विरोधानंतरही, MSBSHSE ने इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा आयोजित केल्या होत्या. मागील वर्षांप्रमाणे यंदा पेपरची वेळ आणि मूल्यांकन या दोन्ही निकषांमध्ये बदल करण्यात आला आहे.
शक्यतो १७ तारीख किंवा २० च्या आत निकाल जाहीर होईल