आमदार रोहित पवारांनी वाराणसीवरून आणलेल्या पवित्र गंगाजलाने होणार महाराष्ट्रातील सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रांना अभिषेक

0
160

जामखेड न्युज – – – – –

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार नुकतेच देशाच्या विविध राज्यातील अनेक धार्मिक स्थळांची यात्रा करण्यासाठी गेले होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या वाराणसीच्या विश्वेश्वराची पूजा, अभिषेक व गंगाआरती केल्यानंतर आपल्या धर्मात अध्यात्माला आणि तीर्थक्षेत्राला असलेले महत्त्व लक्षात घेऊन त्यावेळी मतदारसंघासह महाराष्ट्राच्या विविध भागातील धार्मिक व आध्यात्मिक स्थळांच्या ठिकाणी ह्या गंगाजलाने अभिषेक करण्याची कल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी तात्काळ ही कल्पना कृतीत उतरवण्यासाठी प्रयत्न केले.

गंगाजलाचे शेकडो कलश तयार करून राज्यातील प्रमुख धार्मिक व अध्यात्मिक तीर्थस्थळी ते पाठवण्यात येत आहेत. त्याचा शुभारंभ कर्जत शहरातून बुधवारी आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत झाला आहे. विविध भागातील धार्मिक स्थळांची यादी बनवून त्याकडे स्वतः विशेष लक्ष देऊन आमदार रोहित पवारांनी राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळांना हे गंगाजल पोहचवण्याची व्यवस्था केली आहे. हजारो किमी प्रवास करून हे गंगाजल संपूर्ण महाराष्ट्रभर पोचवले जात आहे.

या माध्यमातून हजारो किमी प्रवास करून हे पवित्र गंगाजल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व प्रमुख अध्यात्मिक व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाणार आहे. राज्याच्या व देशाच्या कल्याणासाठी स्थानिक प्रथेनुसार पूजा – अभिषेक करून संबंधित देवस्थानच्या पुजारी, विश्वस्त यांनी प्रार्थना करावी अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी पत्र लिहून सर्वांना केली आहे. या माध्यमातून आपली परंपरा जपण्याचा व ती पुढे नेण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार यांच्याकडून होत असल्याचं दिसून येत आहे. आमदार रोहित पवार नेहमीच असे प्रयत्न करत असतात. अशा पद्धतीनेच स्वराज्य ध्वजाने सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात हजारो किमी प्रवास केला होता त्यानंतर त्याची उभारणी खर्डा येथे करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here