जामखेड न्युज – – – –
बीडमधील अवैध गर्भपात प्रकरणात महिलेचा मृत्यू झाला आणि त्या प्रकरणात आरोपी नर्स चा मृतदेह तलावात आढळला. आता या प्रकरणात नवे वळण आले असून या प्रकरणात गर्भलिंग निदान करणारा डॉक्टर फरार होता. त्या डॉक्टरला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिला नाही. या प्रकरणाची मुख्य आरोपी मनीषा सानप ही अंगणवाडी सेविका असून ती सध्या तुरुंगात आहे. तर या मधील नर्स सीमा डोंगरे हिचा मृतदेह तलावात आढळला.तर गर्भातील लिंगाचे निदान करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद घेण्यार असल्याचे समजली आहे.
बीडमध्ये शीतल गाडे या महिलेचे अवैध गर्भपात केल्यामुळे जास्त रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. या प्रकरणात मयत महिलेच्या सासरच्या काही लोकांना आणि पतीला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनीषा सानप यांच्यावर गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्यांना 14 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.