जामखेड न्युज – – – –
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून जामखेड शहरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. काल रक्तदान शिबीर तसेच भवानी मातेचा जागर करण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील गणपती मंदिरात आरती करून प्रत्येक पथकाने आपली सलामी देत बीड रोडवरून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. यात देशभरातील नामांकित विविध पथकांनी जामखेड करांच्या डोळ्याचे पारणे फेडले जवळपास पाऊण किलोमीटर मिरवणूक होती.

शनिवारी भव्य दिव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शेकडो तरूणांनी रक्तदान केले तसेच सायंकाळी तुळजाभवानी मातेचा जागर जागरण गोंधळ कार्यक्रम होता आज सकाळी हजारो शिवप्रेमीच्या उपस्थितीत वेदमंत्रांच्या घोषात अभिषेक आणि महापूजा करण्यात झाली. यावेळी वाद्यांच्या गजरात शिवमूर्तीचा सप्त नद्या गडकोट किल्ले येथून आणलेले जल याने अभिषेक केला आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदयी आहे. याच तिथीला शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला. सर्व सण एका बाजूला आणि शिवराज्याभिषेक एका बाजूला, एवढे या सणाचे महत्त्व आहे. त्यामुळे हा सण सर्वांनी उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरा करायला हवा, असे मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारकरी पांडुरंग भोसले जामखेड न्युजशी बोलताना यांनी सांगितले.

आज दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील गणपती मंदिरात आरती करून प्रत्येक पथकाने आपली सलामी देत बीड रोडवरून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. यात
रोप मल्ल खांब मुलींचे तसेच मुलांचे मल्लखांब पथक तसेच लाठीकाठी शस्त्र पथक, मध्यप्रदेश उज्जैन येथील महाकाळेश्वर डमरू पथक हे विशेष आकर्षण होते. राज्यातील हलगी पथक, संबळ पथक, तसेच बारा जोतीर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली होती. याचबरोबर शंकर महादेव व नंदी मुर्ती देखावा, गाय वासरू मुर्ती देखावा, जळगाव बॅड पथक
सटाना डिजे बॅन्जो, तसेच अश्व पथक पारंपारिक वेशातील मावळे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचे
वेश परिधान केले होते. तसेच विशेष आकर्षण छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची घोड्यावरील मुर्ती होत्या. भव्य दिव्य असा भगवा ध्वज हातात घेऊन चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केले.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुराजे भोसले यांनी सर्वाना एकत्र घेऊन उत्कृष्ट नियोजन केले होते. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मिरवणूकीत सहभागी होऊन वेगवेगळ्या पथकातील वाद्यांचा आस्वाद घेतला.
मिरवणूक हि सुमारे पाऊण किलोमीटर होती. खुप मोठी गर्दी होती. याच वेळी एक रुग्णवाहिका आली तेव्हा कार्यकर्त्यांनी एका क्षणात गर्दी हटवत रूगणवाहिकेला रस्ता करून दिला. मिरवणूकीमुळे जामखेड करांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
चौकट
भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूकीत मोठ्या प्रमाणावर गर्दी असताना पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संपुर्ण टिमने वाहतुकीचे चांगले नियोजन केले होते. कसलाही वाहतूक खोळंबा झाला नव्हता पोलीस प्रशासनाने वाखाणण्याजोगी वाहतूक नियोजन केले होते.