सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील गुन्हेगारास संगमनेर तालुक्यातून अटक !

0
247
जामखेड न्युज – – – – 
गायक व काँग्रेस पक्षाचे नेते सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात संशयित असलेल्या पुणे जिल्ह्यातील दोघांपैकी एका सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पुणे नगर सीमेवरील बोटा शिवारात बेड्या ठोकल्या.
हत्याप्रकरणातील संशयित संतोष जाधव याचा साथीदार सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ (वय-19) असे त्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी (7 जून) रोजी करण्यात आली. सिद्धु मुसेवाला हे 29 मे रोजी त्यांच्या सहकार्‍यांसह पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावातून त्यांच्या कारमधून जात होते.
त्यावेळी त्यांचा पाठलाग करीत टोळक्याने त्यांच्यावर भरदिवसा गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. या घटनेचे पंजाबमध्ये तीव्र पडसाद उमटले असतानाच, केंद्रीय गृहमंत्रालयाने देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन या प्रकरणाचा तपास स्वतंत्र पथकामार्फत करण्याचा आदेश दिला होता.
दरम्यान, दिल्लीतील गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने त्याच्या सहकार्‍याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मुसेवाला यांची केल्याचे त्याच्या चौकशीतून पुढे आले. हत्या करणार्‍यांमध्ये पंजबामधील 3, राजस्थानातील तीन व पुण्यातीन संतोष जाधव व सौरभ महाकाळ या दोघांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. दरम्यान, पंजाब पोलिसांनी तिघांना यापुर्वी अटक केली आहे.
त्यानंतर सतर्क झालेल्या पुणे ग्रामीण पोलिस जाधव व महाकाळ याच्या मागावर होते. मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित महाकाळ पुणे नगर सीमेवरील बोटा शिवारात असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पथकाने महाकाळ यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यास अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले, त्यावेळी त्यास 20 जुनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र पंजाबचे प्रसिद्ध गायक खुन प्रकरणात संशयित गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पुणे नगर सीमेवरील बोटा शिवारात बेड्या ठोकल्याने बोटा परिसरात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here