जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी १० जून १९९९ ला केली. यास आज २३ पुर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जामखेड शाखेच्या वतीने आ.रोहित दादा पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा.मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी सभापती सुर्यकांत मोरे, सभापती संजय वराट, ज्येष्ठ नेते वैजिनाथ पोले, सुरेश भोसले, उमरभाई कुरेशी, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रकाश काळे, बिभीषण परकड, ईस्माईल सय्यद, शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे, प्रदिप शेटे, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाचे ध्येय धोरण तसेच पक्षाचे विचार सांगत मनोगत व्यक्त केले तसेच सर्वांनी येणाऱ्या काळात कुठलेही गट तट न मानता एकीने पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत व आ.रोहित दादांच्या माध्यमातून होत असलेला विकास शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा तसा संकल्प करावा ही भावना मनोगतांमधून व्यक्त झाली.





