जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जामखेड शहरात सर्व सुविधांनी युक्त असे जीवन साई हाॅस्पिटलचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. आज पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी हाॅस्पिटलला सदिच्छा भेट दिली व हाॅस्पिटलच्या अडीअडचणी विषयी चर्चा केली तसेच गरीब व गरजू रूग्णांच्या रि रिप्लेसमेंटच्या शस्त्रक्रिया मोफत करण्याचे आश्वासन दिले याचबरोबर डॉक्टर असोसिएशनचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष शहाजीराजे भोसले, युवा नेते राहुल उगले, भानुदास बोराटे, अवधूत पवार, बावीचे सरपंच निलेश पवार, डॉ. सुहास सुर्यवंशी, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. सुशील पन्हाळकर, डॉ. गफार शेख, कौशल्य लॅबचे गोकुळ कोल्हे, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भरत देवकर, सचिव डॉ. सादेख पठाण यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जामखेड शहरात महाराष्ट्र बँके शेजारी बस स्टँण्ड जवळ जीवनसाई हाँस्पिटल चे उद्घाटन डॉ. राहुल पंडित यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले याच हाॅस्पिटलला आज आमदार डॉ सुधीर तांबे यांनी सदिच्छा भेट दिली.
जामखेड न्युजशी बोलताना डॉ. सादेख पठाण म्हणाले, अहमदनगर येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सारख्या सुविधा जामखेड येथील जीवनसाई हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असणार आहेत.
यावेळी बोलताना डॉ. राहुल पंडित म्हणाले , माफक दरात आणि कमी वेळेत उपचार कसे मिळतील हा प्रयत्न जामखेड मध्ये असेल.
डाॅ.प्रदीप तुपेरे यांनी जीवन साई हाॅस्पिटल येथे दिनांक शनिवार दि. 18.6.2022 रोजी मोफत मुळव्याध उपचार शिबिर घेण्यात येणार असल्याचे आपल्या भाषणात जाहीर केले.
चौकट
जामखेड सारख्या ठिकाणी सर्व सुविधांनी युक्त अॅक्सीडेंट, सर्जिकल व आयसीयु विभाग नगर येथील डॉ. राहुल पंडित ट्रामा व स्पाईन सर्जर जाॅइट रिप्लेसमेंट फेलो यांच्या मार्गदर्शनाखाली हाॅस्पिटल सुरू करत आहोत आमच्या हाॅस्पिटल आज आमदार डॉ सुधीर तांबे यांनी सदिच्छा भेट दिली अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच डॉक्टर संघटनेच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले याचबरोबर जे गरिब व गरजू रूग्ण आहेत त्यांना महागड्या हाडाच्या शस्त्रक्रिया करणे आवाक्याबाहेर आहे अशा रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल असे आमदार साहेबांनी सांगितले.
डॉ. सादेख पठाण – सचिव डॉक्टर असोसिएशन जामखेड