सालकरी गड्याचा मुलगा -दोन वेळा आमदार एकदा मंत्री प्रा.राम शिंदे…! संघर्षयोद्ध्याचा जीवनपट…!!!

0
248
जामखेड न्युज – – – – – 
                   (सुदाम वराट) 
प्रा.राम शिंदे यांचा जन्म १ जानेवारी १९६९ रोजी चौंडी येथील गरिब शेतकरी कुटुंबात झाला. वडील शंकरराव हे शेतमजूर , दुस-याच्या शेतात सालकरी गडी म्हणून काम करण्यातच अर्धे आयुष्य गेलेले. अशा अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत प्रा शिंदे यांची जडणघडण झाली. परिस्थितीवर मात करत प्रा शिंदे यांनी एम. एस्सी. बीएड शिक्षण पुर्ण केले.  प्रा राम शिंदे यांनी प्राध्यापक म्हणून  आष्टी (जि.बीड) येथे प्रारंभीच्या काळात नोकरी केली.
       सन १९९५ मध्ये राज्यात भाजपा शिवसेना युती सरकार आले आणि प्रा राम शिंदेच्या जिवनाला ख-या अर्थाने कलाटणी मिळाली. २५ ऑगस्ट १९९५ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंढे यांनी हजेरी लावली. तत्कालिन ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्यादेवींचे जन्मगाव चोंडी विकास प्रकल्पाचा ध्यास घेत या प्रकल्पाची जबाबदारी साहजिकच त्यावेळी उच्चशिक्षित असलेले प्रा राम शिंदे यांच्यावर सोपवली. हीच जबाबदारी प्रा शिंदे यांच्यासाठी कलाटणी देणारी ठरली.
      त्यावेळी प्रा शिंदे यांच्यावर चोंडी विकास प्रकल्पाचे सदस्य म्हणून  अधिकृत जबाबदारी मिळाली. हे पद प्रा शिंदे यांच्या आयुष्यातील पहिले पद. दरम्यान प्राध्यापक म्हणून नोकरीचा राजीनामा देत चोंडी विकास प्रकल्पाला  त्यांनी वाहून घेतले.  त्यानंतर १९९७ मध्ये त्यांनी राजकासणात उडी घेत भाजपातर्फे पंचायत समितीच्या जवळा गणातून निवडूक लढवली.मात्र मत विभागणीचा फटका बसून,केवळ २०० मतांनी प्रा शिंदे यांना पराभव स्विकारावा लागला.मात्र आयुष्यातील या पहिल्याच निवडणूकीत पराभव वाट्याला आलेला असला तरी हा पराभव प्रा शिंदे यांना  खूप काही शिकवून गेला.
      नंतर तीन वर्षांनी सन २००० मध्ये चौंडी ग्रामपंचायत निवडणूक लढवून प्रा शिंदे यांनी प्रस्थापिंतांची ४० वर्षांची चोंडीतील सत्ता घालवत एकहाती सत्ता मिळवून सलग पाच वर्ष  चोंडीचे सरपंचपद मिळवले.
       यादरम्यान  २००२ जामखेड कृषी बाजार समितीच्या निवडणूकीतील दोन्ही पॅनलमधून प्रा शिंदे यांना उमेदवारी डावलण्यात आली. मात्र प्रा शिंदे यांनी निवडणूकीतून माघार न घेता बाजार समितीच्या दुर्बल घटक मतदार संघातून अपक्ष निवडूक लढवली. मात्र अवघ्या एका मताने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. असाच प्रकार सन २००२ च्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत पाहायला मिळाला. जिल्हा परिषद जवळा गटातून भाजपातर्फे प्रा शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली होती. त्यांनी जवळा गटात प्रचाराला शुभारंभ केला असताना, जवळा गटातील भाजपातील काहींनी प्रा शिंदे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला. विरोध एव्हढा तीव्र होता की, प्रा शिंदे यांनी उमेदवारी दिली तर आम्ही भाजपा सोडून इतर पक्षात जावु.असा इशारा पक्षाला देत, त्यावेळच्या पक्षश्रेष्ठींना कोडयात टाकले. कसलाही राजकीय वरदहस्त नसलेले प्रा शिंदे त्यावेळी एकाकी पडले आणि ऐनवेळी उमेदवारी डावलण्यात आली. भरलेला उमेदवारी अर्ज काढून , पक्षाशी प्रामाणिकपणे काम करण्याचे काम त्यांनी केले.
     त्याचवेळी   २००५ मध्ये चोंडी ग्रामपंचायत निवडणूकीत प्रा शिंदे यांना  पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान सन २००६ मध्ये भाजपाचे जामखेड तालुकाध्यक्षपदी प्रा शिंदे यांची निवड केली खरी. मात्र तालुकाध्यक्षपदी निवड केल्याची अधिकृत घोषणा सहा महिण्याने करण्यात आली.
      सन २००७ मध्ये प्रा शिंदे यांनी आपली पत्नी आशाताई यांनी भाजपातर्फे पंचायत समितीच्या जवळा गणातून निवडूक लढवली आणि मोठया फरकाने निवडून आल्या. त्यांचा विजय भाजपासाठी खूप मोठा होता. जिल्हा परिषद जवळा गटातील भाजपाचे उमेदवार अरणगाव गणातून मागे असताना , जवळा गणातून प्रा शिंदे यांना जी आघाडी मिळाली.त्यावरच भाजपाचे जिल्हा परिषद जवळा गटातील उमेदवार निवडूण आले.विशेष म्हणजे याच उमेदवारांने २००२ च्या जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपाकडून प्रा शिंदे यांना उमेदवारी द्यायाला विरोध केला होता. याच उमेदवाराने नंतर निवडूण आल्यावर उपकाराची परतफेड अपकाराने करत सन २००९ च्या विधानसभा निवडणूकीत प्रा शिंदे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्याला कडाडून विरोध केला.परंतु यावेळी त्यांचे काही चालले नाही. साहजिकच भाजपाकडून प्रा शिंदे यांना विधानसभा उमेदवारी मिळाली. प्रा शिंदे यांना उमेदवारीला विरोध करणारांनी मात्र भाजपाला सोडचिठ्ठी देत इतर पक्षातील उमेदवाराचे काम केले.
      २००९ च्या विधानसभा निवडणूकीत विजयानंतर प्रा शिंदे यांनी सत्तेच्या विरोधात असतानाही मतदारसंघात विकासकामे करत,पकड मजबूत केली.
दरम्यानच्या काळात अहमदनगर भाजपा जिल्हाध्यक्षपदी प्रा शिंदे यांची निवड झाली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश भाजपा  सरचिटणीस-काम पाहिले.     २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत  प्रा शिंदे मोठया फरकाने निवडूण आले. प्रारंभी राज्यमंत्री म्हणून गृह,पणन,आरोग्य व पर्यटन खात्याचे काम करतानाच  नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून  मृद व जलसंधारण , राजशिष्टाचार , ओबीसी कल्याण , पणन व वस्रोद्याग या खात्याचे प्रा शिंदे काम करत  भरीव काम केले. तर नगर जिल्ह्याचे पुर्ण पाच वर्ष पालकमंत्री म्हणून काम केले.
                                                          दरम्यान २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत प्रा शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही खचून न जाता त्यांनी जनतेशी असलेली नाळ तोडली नाही. पक्षाने दिलेली गोवा विधानसभा  निवडणूकीची जबाबदारी त्यांनी  यशस्वी पार पाडली.  प्रा शिंदे यांची पक्षाशी असलेली एकनिष्ठा आणि योगदान पाहून , भाजपा प्रदेश कोअर कमिटी सदस्य म्हणून प्रा शिंदे यांच्यावर नूकतीच जबाबदारी दिली आहे.
      शांत ,संयमी नेतृत्व म्हणून प्रा शिंदे यांची ओळख असली तरी जनतेच्या प्रश्रासंदर्भात मात्र ते कायम आक्रमक राहिलेले आहेत.
      विधानपरिषदेवर संधी देवून भाजपाने प्रा शिंदे यांच्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे. प्रा शिंदे यांच्या कामाचीच ही पावती असून, यामुळे कर्जत जामखेड तालुक्यात भाजपाला आलेली मरगळ दुर होणार आहे.
       प्रा शिंदे यांची विधानपरिषदेवर निवड होणार असल्याचे वृत्त  कर्जत जामखेडमध्ये येताच गावोगाव मंदिरात पेढे वाटण्यात आले, लोकांनी पेढे वाटून, फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here