जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – – (सुदाम वराट)
तालुक्यात सुगीची धामधूम सुरू आसताना दिवसा बंद घरांचे कुलुप तोंडून घरफोडीचे प्रकार सुरु झाल्याने ग्रामीण भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल
तालुक्यातील मोहरी येथील गावात घरातील सर्व लोक शेतात ज्वारी काढायला गेले होते. याच दरम्यान अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील दिड लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने भरदिवसा लंपास केले. तालुक्यातील घरफोडय़ा वाढल्याने पोलीसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.
ग्रामीण भागात सध्या सुगीचे दिवस आहेत त्यामुळे शेतकरी हे ज्वारी काढणीच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे दिवसभर गावात शुकशुकाट आसतो. याच संधींचा फायदा घेऊन तालुक्यातील मोहरी येथील फीर्यादी शेतकरी चंद्रभान माणिक वाघमारे यांच्या घरावर अज्ञात चोरटय़ांनी डल्ला मारला आहे. फिर्यादी हे दि 22 फेब्रुवारी रोजी सकाळी घराला कुलूप लाऊन आपल्या कुटुंबासमवेत शेतात ज्वारी काढण्यासाठी गेले होते. यावेळी भर दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. फिर्यादीचे घरातील व कपाटात ठेवलेल्या सामानाची उचकापाचक करून कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 56 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. भर दुपारी ही चोरीची घटना घडल्या मुळे ग्रामीण भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रभान वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील अज्ञात चोरटय़ांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी भेट दिली असुन पुढील तपास पोलीस सहायक पोलीस निरीक्षक बडे व मनोज साखरे हे करत आहेत.
तालुक्यातील अनेक ठिकाणी सध्या सुगीची धामधूम सुरू आहे लोक घरांना कुलुप लावून जातात याच संधीचा फायदा चोरटे घेतात बंद घराचे कुलूप तोडून चोर्यांचे प्रमाण वाढले आहेत. मागील आठवडय़ात साकत मध्येही काही घरांचे भरदिवसा कुलुप उघडुन चोर्या झाल्या होत्या.