जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – (सुदाम वराट)
केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानांतर्गत आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या स्वप्नातील स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड हरित शहर बनविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश ( दादा) आजबे यांनी स्वच्छता अभियान हि लोकचळवळ बनवली आहे. प्रभाग वीस मधील सुमारे 250 नागरिक गेल्या पाच दिवसांपासून दररोज सकाळी दोन तास श्रमदान करतात यामुळे परिसर चकाचक झाला आहे. स्वच्छते बरोबर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून परिसर हरित केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी घरोघरी जाऊन लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले कचरा संकलनासाठी घरोघरी डस्टबीन वाटप केले. हरित जामखेड साठी प्रभागात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. स्वच्छतेच्या अभियानाला लोकचळवळ बनवून घरा-घरात आणि प्रत्येकाच्या मना-मनात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात यशस्वी ठरल्यानेच, शहरवासीयांसह समाजातील प्रत्येक घटकाची साथ आणि प्रत्यक्ष स्वच्छतेसाठी राबलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अतुलनीय योगदान आहे असे आजबे म्हणाले.

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत जामखेड शहराचा पहिल्या पाचमध्ये क्रमांक आणण्यासाठी आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार हे स्वतः हातात झाडू व खोरे घेऊन स्वच्छता करताना दिसतात स्वच्छता हि लोकचळवळ होऊन स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व्हावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी प्रभाग वीस मधील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले
गेल्या पाच दिवसांपासून सकाळी आठ वाजता प्रभागातील नागरिक लहान मुले, महिला व पुरुष एकत्र येत श्रमदान करत परिसर चकाचक केला स्वतः रमेश आजबे यांनी स्वच्छता करत स्वच्छता हि लोकचळवळ केली आहे.

स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी मोठ्या प्रमाणावर काम सुरू केले आहे स्वतः हातात फावडे घेत तर कधी झाडू घेत अनेक वेळा आमदार रोहित पवार हेही श्रमदान करताना दिसतात.
गेल्या पाच दिवसांपासून सकाळी आठ वाजता प्रभाग वीस मधील महिला, पुरुष, लहान बालके एकत्र येत डॉ. शोभा आरोळे यांच्या घरापासून ते कोल्हे वस्ती पर्यंतचा परिसर स्वच्छ करत चकाचक केला यावेळी स्वतः सामाजिक कार्यकर्ते रमेश ( दादा) आजबे यांनी हातात झाडू घेत स्वच्छता केली यामुळे नागरिकांनीही अंग झटकून स्वच्छता केली. प्रभाग वीस मध्ये रमेश आजबे यांनी स्वच्छता हि लोकचळवळ केली आहे. इतर प्रभागातील नेते व नागरिकांनी हा आदर्श घेऊन आपला प्रभाग स्वच्छ व सुंदर केला तर स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड होईल व जामखेड चा क्रमांक स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये पहिल्या पाच शहरात असेल व आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांचे स्वप्न सत्यात उतरेल.
चौकट
प्रभाग वीस मध्ये सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले व नागरिकांना श्रमदानासाठी येण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे व्हाॅटस्अॅप च्या माध्यमातून दुसर्या दिवशी सकाळी कोणत्या भागातील स्वच्छता करावयाची हे ठरते ठिकाण व वेळ सांगितली जाते त्यानुसार प्रभागात लोक ठरलेल्या जागी न चुकता हजर राहतात व स्वच्छतेची सुरूवात होते. आता हे नित्यनेमाने काम सुरू आहे. यात एक वर्षाची चिमुकली पासुन ते सत्तर वर्षाच्या आजोबांपर्यंत आबाल वृद्ध सहभागी होतात.

चौकट
सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे यांनी आतापर्यंत स्वतःच्या गावाबरोबर मामाचे गावही लोकसहभागातून आदर्श करून दाखविले आहे अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला आहे. अनेक रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत. अनेक ठिकाणी बंदिस्त गटारे, पेव्हिंग ब्लाॅक व मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण करून स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी व हरित जामखेड साठी मोलाचे पाऊल उचलले आहे.