जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
सामाजिक न्याय विभागांतर्गत जामखेड येथे ऊसतोड कामगार संत भगवान बाबा मुलामुलींचे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलामुलींचे तसेच निवासी शाळा आरोळेनगर येथील पाचवी ते पुढील शिक्षणासाठी विनामूल्य वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्याबाबत साहाय्यक समाजकल्याण आयुक्त राधाकिसन देवडे यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह,
वसतिगृह प्रवेशासाठीचे नियम, अटी व शर्ती
टटजातीचा दाखला
मा. तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला
आवश्यक त्या गुणपत्रिका
शाळा सोडल्याचा दाखला
आधारकार्ड
बॅंक पासबुक झेरॉक्स तसेच अर्जासोबत विद्यार्थ्याचे तीन आयकार्ड साईज फोटो जोडणे आवश्यक आहे.
वसतीगृहातील विद्यार्थ्यांना नाष्टा, दोन वेळचे जेवण, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता अशा अनेक सुविधा मिळतात त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांनी वसतीगृहात प्रवेश घ्यावा असे आवाहन साहाय्यक समाजकल्याण आयुक्त राधाकिसन देवडे यांनी जामखेड न्युजशी बोलताना केले आहे.