आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचे कर्जत शहरात आयोजन

0
203
जामखेड न्युज – – – 
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत शहरात राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि हीच परंपरा जपण्यासाठी आणि जोपासण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी शर्यतीचे आयोजन केले आहे. या शर्यतीमधील विजेत्यांना लाखोंची बक्षिसे देखील दिली जाणार आहेत.
आपल्याकडे शेतीच्या कामाव्यतिरिक्त आपली परंपरा जपण्यासाठी तसेच शेतकरी आणि बैलाचे असणारे नाते आणखी घट्ट करण्यासाठी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जाते. परंतु, या बैलगाडी शर्यती गेल्या काही वर्षांपासून कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने त्यांच्यावर बंदी आली होती. पण अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्याला अटी शर्थींसह मान्यता दिली आहे. ग्रामीण भागात विविध प्रकारच्या शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी व कमी अंतराच्या मालवाहतुकीसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून बैलगाडीने महत्त्वाची अशी भूमिका बजावली आहे. आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत महाराष्ट्रात बैलपोळा हा सर्जा-राजाचा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो. त्यानंतर आता राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत आयोजित करून शेतकऱ्यांसाठी प्रतिष्ठेची आणि सन्मानाची समजली जाणारी अशी ही परंपरा जोपासण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी एक पाऊल टाकले आहे.
गुरुवार, दिनांक २ जून रोजी सकाळी ९ वाजता या बैलगाडी शर्यतीचा थरार कर्जत शहरातील बघायला मिळणार आहे. त्यासाठी आवर्जून सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे व या स्पर्धेचा थरार अनुभवावा असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here