जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर आर्थिक परिस्थितीवर मात करत आष्टी तालुक्यातील अंभोरा गावची सुकन्या मिनाज आदम सय्यद हिची महाराष्ट्र पोलीसपदी निवड झाली आहे. मिनाज हि आष्टी तालुक्यातील पहिलीच महिला पोलीस दलात चालक म्हणून चालक म्हणून जबाबदारी स्विकारणारी मुलगी आहे. त्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. आमदार सुरेश धस तसेच तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. तसेच जामखेड पत्रकार संघाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला यावेळी जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, सुदाम वराट, अविनाश बोधले, जाकीर शेख उपस्थित होते.
मिनाज सय्यद हिची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. घरात चार भावंडे त्यांच्या शिक्षणाचा भार आई वडिलांनी उचलला व चारही मुलींना पदवी पर्यंत शिक्षण दिले. घरची परिस्थिती गरिबीची आहे म्हणून न डगमगता मिनाज सय्यदने जिद्द चिकाटी व मेहनतीच्या बळावर यश मिळविले आहे. मिनाज हि आष्टी तालुक्यातील पहिलीच मुलगी चालक पदाची जबाबदारी स्विकारणारी ठरली आहे.
मिनाज सय्यदचा आदर्श ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असा आदर्श निर्माण केला आहे. आई वडिलांनी मुला मुलींमध्ये भेदभाव न करता चांगले शिक्षण दिले पाहिजे चालक पोलीस परिक्षेत अंभोऱ्याची मिनाज सय्यद ठाणे विभागात दुसरी आली आहे.