जामखेड न्युज – – – –
राज्यभरात गाजलेल्या टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे जळगावात असल्याचे स्पष्ट झाले असून पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी जळगावातून एका वकिलाला अटक केली आहे. अॅड. विजय दर्जी असे अटक केलेल्या वकीलाचे नाव आहे. दर्जी हे विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य असून बालाजी प्लेसमेंट नावाने गोलाणी मार्केटमध्ये त्यांची शाखा आहे. यात सुशिक्षीत तरुणांना नोकरी देण्याचे काम ते करतात.
या गुन्ह्याचा तपास पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. यात म्हाडा पेपरफुटीचे प्ररकणही समोर आले आहे. अॅड. दर्जी यांच्या बालाजी जॉब प्लेसमेंटच्या कार्यालयात बुधवारी सकाळी पुणे पोलिसांचे पथक आले. दर्जी यांच्या कार्यालयातील एक कर्मचाऱ्याची चौकशी काही महिन्यांपुर्वी झाली होती. यात अनेक पुरावे पोलिसांना मिळाले होते. त्यानुसार बुधवारी पथकाने चौकशीअंती दर्जी यांना अटक करुन पुण्याला चौकशीसाठी नेले आहे.