जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
तालुक्यातील चोंडी येथे होणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार राहणार उपस्थित राहणार आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघाचे आ. रोहित पवार यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण दिले असून त्यांनीही हे निमंत्रण स्विकारून उपस्थित राहण्याचे मान्य केले असल्याचे समजते. तसेच महाविकास आघाडी सरकारचे अनेक मंत्री व पक्षाचे मान्यवर नेतेही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे दि. ३१ मे रोजी होणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून रस्त्याच्या रूंदीकरणाचे कामही युध्द पातळीवर सुरू आहे. याबरोबरच अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास तसेच नवग्रह व राशीच्या परिक्रमा शिल्पांना
रंग देण्याचे काम, सुशोभीकरण, रंगरंगोटी, डागडुजी तसेच स्वच्छता मोहिम व मंडप कोरेशन सह जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती चोंडी गावचे सरपंच सुनिल उबाळे व अक्षय शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून चौंडी येथील बागेतील नवग्रह व राशीच्या परिक्रमा शिल्पांचे सुशोभीकरण, रंगरंगोटी, महादेव मंदिर परिसरातील फरशी व वाड्यातील भुयारी लाईट व तडे गेलेल्या भिंतींची डागडुजी तसेच कर्जत-जामखेड वरून चोंडीकडे येणाऱ्या , बागेतील झाडांची छाटणी करून सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे.
आ. रोहित पवार आमदार झाल्यापासून चौंडी गावचा विकास मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तसेच जयंतीला सर्व पक्षीय नेत्यांनी व सर्व जातीधर्माच्या लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
चौकट
जिल्ह्यातील तसेच आसपासच्या जिल्ह्यातील सर्वच मंत्री व आमदार उपस्थित राहणार आहेत सुमारे पाचशे नेते बसतील एवढे स्टेज बनवण्याचे काम सुरू आहे. कार्यक्रमाची जोरदार जय्यत तयारी सुरू आहे.