Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या बेकायदेशीर जमावाने क्षिररसागर कुटुंबियांचे सामान उघड्यावर फेकून घर केले जमीनदोस्त – दहा...

बेकायदेशीर जमावाने क्षिररसागर कुटुंबियांचे सामान उघड्यावर फेकून घर केले जमीनदोस्त – दहा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल

0
324
जामखेड प्रतिनिधी
               जामखेड न्युज – – – – –
बेकायदेशीर जमाव जमवून आरोपी प्रकाश जगन्नाथ नागरगोजे याने फीर्यादी च्या घरातील सर्व सामान बाहेर फेकुन घर पाडले व जागेचा ताबा मिळवला. त्यामुळे या ठिकाणी रहात आसलेल्या क्षिरसागर कुटुंबाचा संसार उघडय़ावर पडला. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला एकुण १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील संताजी नगर भागात फीर्यादी विठ्ठल प्रकाश शिक्षरसागर रा. संताजी नगर हा आपली आई बेबी प्रकाश शिक्षरसागर यांच्या सह घर व गोठा बांधुन रहात आहेत. या जागेचा वाद न्यायालयात दाखल आहे. दि १४ रोजी मध्यरात्री या ठिकाणी क्षिरसागर कुटुंब हे घरात झोपले असताना आरोपी प्रकाश जगन्नाथ नागरगोजे रा. शिवाजीनगर व इतर दहा ते बारा अनोळखी इसम त्या ठिकाणी आले व घरात प्रवेश करून घरातील सर्व साहीत्य घराबाहेर फेकले तसेच हातातील टीकाव, खोरे, व पहाराच्या सहाय्याने फीर्यादी चे घर पाडुन नुकसान केले. तसेच जनावरांचा गोठा पाडुन नुकसान करुन कडब्याची गंज बाहेर फेकुन दिली. त्यामुळे क्षिरसागर कुटुंबाचा संसार उघडय़ावर आला आसुन आम्ही कोठे जायचे आमच्यावर अन्याय झाला असुन आम्हाला न्याय मिळावा तसेच आमच्या घराची झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील शिरसागर कुटुंबाने केली आहे. या प्रकरणी फिर्यादी विठ्ठल प्रकाश शिक्षरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश जगन्नाथ नागरगोजे याच्या सह एकुण १० ते १२ जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. संजय लोखंडे हे करत आहेत.
संताजी नगर भागात फीर्यादी ची आई बेबी प्रकाश शिक्षरसागर, यांच्या सह साधना वसंत अवसरे, अनुराधा शिवाजी ढगे व समाधान प्रकाश माळी अशा चार जणांच्या वेगवेगळ्या ठिकाणी जागा आहे. यातील काही जागा मोकळी असुन या ठिकाणी देखील आरोपींनी अतिक्रमण केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!