जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
तालुक्यातील खर्डा येथिल युवक विशाल ईश्वर सुर्वे (वय ३२) याचा दि. १४ च्या मध्यरात्री निघृण हत्या करण्यात आली होती यामुळे एकच खळबळ उडाली होती पोलीसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केले होते पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत दोनच दिवसात तीन आरोपींना अटक केली आहे आज तीनही आरोपींना श्रीगोंदे येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत मयताची पत्नी
मयताचा चुलत चुलत भाऊ कृष्णा संजय सुर्वे, वय १९ तिसरा श्रीधर राम कन्हेरकर वय २७ या तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.
मयताची पत्नीचे व कृष्णा यांचे अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधातून पुजाने मयत पती यांचे लोकेशन कृष्णाला दिले त्याने त्याचा मित्र कन्हेरकर यास घेऊन रस्त्यावर मोटारकार आडवी लावली व गाडी बंद पडल्याचे नाटक केले ज्यावेळेस मयत विशाल गाडी घेऊन आला त्यावेळी रस्त्यावर गाडी अडवी दिसल्याने गाडी थांबवली व कारण विचारले तेव्हा गाडी बंद पडली आहे क्रृ ड्रायव्हर हवा आहे. तसेच परत पान्हा हवा आहे तो पान्हा काढत आसताना मंदिराच्या पाठीमागे लपलेल्यांने आंधारात येऊन मयत विशालच्या डोक्यात लोखंडी राॅड घातला तो खाली पडल्यावर परत राॅडने वार केले. यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता यातच तो मयत झाला
याबाबत फिर्यादी सुशेन ईश्वर सुर्वे वय २६ रा. सुर्वे वस्ती खर्डा ता. जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते की की, विशाल सुर्वे हा शुक्रवारी दि. १३ रोजी खर्डा येथिल एका व्यापाऱ्याचा माल आणण्यासाठी बीड जिल्ह्य़ातील वडवणी येथे गेला होता रात्री अकरा वाजता खर्डा येथिल व्यापाऱ्यांकडे माल उतरविला व घरी. जात आसताना रात्री साडे अकराच्या सुमारास सुर्वे वस्ती रोडवरील लक्ष्मीआई मंदिराच्या मागे कच्च्या रस्त्यावर अज्ञात इसमांनी अज्ञात कारणांनी अज्ञात हत्यारांनी डोक्यास डाव्या बाजूला जबर मारहाण करून ठार मारले सकाळी ही घटना लक्षात आली. घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली होती.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच गुन्हे अन्वेषण विभाग, डाॅग पथक, ठसे तज्ञ यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली होती
सदर गुन्ह्याचे ग्राभीर्य पाहून पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी स्वतः गुन्ह्याचा तपास हाती घेतला पोलिस अधीक्षक मनोज पाटील, उपअधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, साहाय्यक निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन मखरे, भाऊसाहेब कुरुंद, सखाराम मोटे, विश्वास बेरड, पोलिस नाईक विशाल दळवी, रोहित मिसाळ, सागर ससाणे, मेघराज कोल्हे यांनी समांतर तपास सुरू केला होता. दि. १५ रोजी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात पोलिस अंमलदार सचिन पिरगळ, संग्राम जाधव, अविनाश ढेरे, संभाजी शेंडे, शेषराव म्हस्के, आबासाहेब आवारे, विजय कोळी, अरूण पवार, संदिप राऊत यांनी खर्डा परिसर पिंजून काढून अत्यंत बारकाईने माहिती काढून मुख्य आरोपी कृष्णा संजय सुर्वे वय १९ वर्षे रा. खर्डा यास अटक केली याने गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्यात सहभागी असलेले श्रीधर राम कन्हेरकर यास खर्डा शिवारात अटक केली.
खुनाच्या गुन्ह्याची २४ तासांमध्ये उकल करून तीन आरोपींना अटक केली आहे त्यामुळे जामखेड पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.