जामखेड न्युज – – – –
3 जून ते 13 जून रोजी पंचकुला, हरियाणा येथे ,क्रीडा व युवक मंत्रालय ,भारत सरकार,आयोजित 4 थ्या खेलो इंडिया युथ स्पर्धा-2021 साठी थांगता खेळामधून रोहित शिवाजी थोरात ची निवड झाल्याबद्दल जामखेड कर्जत चे आमदार आदरणीय रोहित दादा पवार यांच्या हस्ते पंचायत समिती जामखेड येथे सत्कार करण्यात आला.
ADVERTISEMENT
रोहितने थांगता खेळामध्ये यापूर्वी राज्य स्पर्धेमध्ये 2 सुवर्ण व एक रौप्य पदक तर राष्ट्रीय थांगता स्पर्धेमध्ये एक रौप्य पदक मिळवलेले आहे.त्याला अ.नगर जिल्हा थांगता संघटनेचे सचिव व प्रशिक्षक लक्ष्मण उदमले ,व शाम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या निवडीबद्दल जामखेड कर्जत चे आमदार आदरणीय रोहित दादा पवार ,जामखेड कर्जत विधान सभा अध्यक्ष प्रा.मधुकर राळेभात जामखेड तहसिलदार योगेश चंद्रे साहेब,गट विकास अधिकारी प्रकाश पोळ,पं.स.सभापती सुर्यकांत मोरे,राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष दत्ता वारे, संजय वराट, यांनी अभिनंदन केले व पुढोल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.