जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
कर्जत-जामखेडचे भाग्य विधाते लोकप्रिय आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यामुळे जामखेड पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी अकरा कोटी रुपये मंजूर झाले आहेत यातून पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणार्या ३२ निवासस्थानाचा भुमीपुजन सोहळा उद्या दि १६ रोजी आ. रोहित पवार यांच्या हस्ते होणार संपन्न होणार आहे. या मुळे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न कायम स्वरूपी मिटणार आहे.
ADVERTISEMENT
गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांची रहाण्याची गैरसोय होत होती. हीच गैरसोय लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी या बाबत कर्मचाऱ्यांच्या निवासा बाबत अडचणी समजून घेतल्या. आणि तातडीने या निवास बांधण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून ३२ निवासस्थानासाठी १० कोटी ९१ लाख रुपये मंजूर झाले. याचा भुमीपुजन सोहळा उद्या दि १६ रोजी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तसेच आय टी आय हॉस्टेल च्या कामांची पहाणी व शहरातील विविध दालनांचा शुभारंभ देखील आ. रोहित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
चौकट
आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचारी निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लागला आहे एका महिन्यात ते काम पुर्ण होईल आता पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी ३२ निवासस्थाने मंजूर झाली आहेत त्यामुळे रस्ते, वीज, पाणी याचबरोबर अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थानाचा प्रश्नही सुटत आहे.




