जामखेड न्युज – – – –
कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोलजी राळेभात व जामखेड मार्केट कमिटीचे माजी सभापती तथा संचालक सुधीर दादा राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक बिनविरोध होत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा नायगाव सेवा संस्थेवर फडकला आहे.
सतत १५ वर्षापासून नायगाव सोसायटी सहकार महर्षी जगन्नाथ तात्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असुन संचालक मंडळाने अत्यंत चांगले कामकाज केलेले आहे. संस्थेस नायगाव, नाहुली व बांधखडक या गावांचा समावेश असून साधारण ५ ते ६ हजार लोकसंख्या असलेले मोठे कार्यक्षेत्र नायगाव संस्थेस लाभलेले आहे.महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती २०१९ अतर्गत नायगाव संस्थेस २५० सभासदासाठी रक्कम रु १ कोटी २६ लाख ४२ हजार कर्जमाफी झालेली आहे.त्याच कामकाजाची पोहोच पावती म्हणून यावर्षीची निवडणूक बिनविरोध झालेली आहे.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संजय उगले, अश्रू उगले, शिवाजी ससाणे, रावसाहेब जाधव, नंदकुमार उगले, बाळासाहेब उगले, शांतीलाल वारे, विनोद उगले, तान्हाजी फुंदे,दिलीप बाहीर,अशोक पाटील,बाळू मुरकुटे,राजेंद्र कुटे,मंगेश वारे, हेमंत नाना उगले, भारत उगले, सोमनाथ जाधव, विष्णू काळदाते, अर्जुन दराडे, अंकुश गायकवाड, नारायण शिंदे यांनी सहकार्य केले.
बिनविरोध उमेदवार – पाटील अशोक सर्जेराव, उगले अश्रू अजिनाथ, काळदाते संजय मुरलीधर, बहीर नंदकुमार नाना, उगले परमेश्वर विठ्ठल, चोरघडे महादेव दशरथ, वनवे सखाराम साहेबराव, पवार अशोक मुरलीधर, वारे सुमन नवनाथ, बहीर हौसाबाई प्रभाकर, उगले संजय बापूराव, वनवे सोपान बाजीराव, गायकवाड चंद्रकांत राजाराम यांचा समावेश असून अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या जामखेड शाखेमध्ये बँकेचे संचालक श्री.अमोल जगन्नाथ राळेभात साहेब यांनी नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार केला.
यावेळी कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार साहेब, सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात व संचालक अमोल जगन्नाथ राळेभात साहेब यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.