जामखेड न्युज – – – – –
निवडणूक निर्णय अधिकारी श्री.मुंढे साहेब व श्री.हरिदास काळदाते यांच्या उपस्थितीमध्ये सुभाषवाकी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सर्व १३ संचालकाच्या उपस्थितीत चेअरमनपदासाठी अनंता दत्तात्रय सावंत तर व्हा.चेअरमनपदासाठी सोमनाथ लक्ष्मण श्रीरामे यांचा अर्ज दाखल झाल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आली.
सुभाषवाकी या संस्थेस महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती २०१९ अतर्गत २१६ सभासदासाठी रक्कम रु १ कोटी ७० लाख २५ हजार कर्जमाफी झालेली आहे. तसेच सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली या गावाने लोकवर्गणीतून संस्थेसाठी इमारत बांधलेली आहे, हि खरच कौतुकास्पद बाब आहे.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळाचा बँकेच्या जामखेड शाखेमध्ये बँकेचे संचालक श्री.अमोलजी राळेभात साहेब यांनी सत्कार केला. यावेळी बँकेचे संचालक अमोल राळेभात साहेब यांनी गावातील गट-तट, हेवे-दावे बाजूला ठेवून एक विचाराने आजपर्यंत जसे काम केले तसेच काम येथून पुढे कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचप्रमाणे सुभाषवाकी ही संस्थेच्या ९९ % सभासदांना ऊस पिकासाठी कर्ज वाटप करणारी तालुक्यातील एकमेव संस्था आहे. तसेच मागील २ वर्षापासून संस्थेची बँक पातळीवर १०० % वसूली होत असून यावर्षीही ३० जून अखेर संस्थेची १०० % वसुली करण्याचा निर्धार संचालक साहेब यांनी केला.
यावेळी कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार साहेब, सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात व संचालक अमोल जगन्नाथ राळेभात साहेब यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.